आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी 13 वर्षांनी मोठ्या तर कधील 9 वर्षांनी लहान अॅक्टरसोबत केला आहे ऐश्वर्याने रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'इरुवर'मध्ये मोहनलालसोबत ऐश्वर्या. दुसरीकडे 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीरसोबत ऐश्वर्या. - Divya Marathi
'इरुवर'मध्ये मोहनलालसोबत ऐश्वर्या. दुसरीकडे 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीरसोबत ऐश्वर्या.
मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आज वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 नोव्हेंबर  1973 रोजी मंगळूरु येथे जन्मलेल्या ऐश्वर्याने 1997 साली 'इरुवर' या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलालसोबत ऐश्वर्या रोमान्स करताना दिसली होती. मोहनलाल वयाने ऐश्वर्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. या चित्रपटाच्या रिलीजवेळी मोहनलाल 37 वर्षांचे तर ऐश्वर्या 24 वर्षांची होती.

ऐश्वर्या केवळ स्वतःपेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्यासोबतच नव्हे तर वयाने लहान अभिनेत्यासोबतही रोमान्स केला आहे. 2016 मध्ये आलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात ऐश्वर्याने तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान रणबीर कपूर (35) सोबत इंटीमेट सीन्स दिले होते. यावरुन बच्चन कुटुंबीय तिच्यावर नाराज असल्याची चर्चा समोर आली होती.  
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या हीरोसोबत पडद्यावर रोमान्स केला.  

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या अभिनेत्रींनी केला कमी वयाच्या हीरोसोबत ऑनस्क्रिन रोमान्स...  
बातम्या आणखी आहेत...