आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याच्या लग्नात सहभागी झाली नव्हती तिची मोठी जाऊ, मनात होती या गोष्टीची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनच्या लग्नात अलाबादच्या त्यांच्या अनेक नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आतेभावाच्या कुटुंबाचाही समावेश आहे. या कुटुंबातील सून अर्थातच ऐश्वर्याच्या थोरल्या जाऊबाईंना ऐश्वर्या-अभिषेक यांच्या लग्नात सहभागी होता न आल्याची खंत वाटते. ऐश्वर्याने 1 नोव्हेंबर रोजी वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने divyamarathi.com ने ऐश्वर्याच्या जाऊबाईंशी संवाद साधला.

बच्चन यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात नातेवाईक...
- हरिवंश राय बच्चन (अमिताभ बच्चनचे वडील) यांचे वडील प्रताप नारायण श्रीवास्तव यांनी अलाहाबादच्या कटघर क्षेत्रात एक घर बनवले होते. या घरात एकेकाळी अमिताभ यांची आत्या भगवान देवी यांचा मुलगा (अमिताभ बच्चन यांचा आतेभाऊ) रामचंदर आणि त्यांची पत्नी कुसुमलता वास्तव्याला होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा तिसरा मुलगा अनूप त्यांची पत्नी मृदुला आणि मुलांसोबत आता येथे राहात आहेत. 
- divyamarathi.comच्या टीमने अनुप आणि मृदुला यांच्याशी संवाद साधला. हे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे. मृदुला यांनी सांगितले. काका-काकू (अमिताभ बच्चन आणि जया बच्चन) यांच्याकडून आम्हाला अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाची पत्रिका मिळाली होती. 
- पण हलाखीच्या परिस्थितीमुळे आम्हाला बच्चन कुटुंबीय आणि इतर कुणी ओळखणार नाही, या भीतीपोटी आम्ही लग्नात सहभागी झालो नव्हतो. 
- अभिषेकच्या लग्नात सहभागी होण्याची अनूप आणि मृदुला यांची मनापासून इच्छा होती. पण परिस्थितीमुळे ते या लग्नात सहभागी होऊ शकले नव्हते.
 - अनुप इलेक्ट्रिकचे काम करतात. हे त्यांचे उदरनिर्वाह एकमेव माध्यम आहे.

वडिलोपार्जित घर ठरले वादाचे कारण
- अनुप आणि मृदुला त्यांच्या मुलीसोबत डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या कटघर स्थित घराच्या एका भागात वास्तव्याला आहेत.
- हे वडिलोपार्जित घर असून याच घरामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
- अनुप यांची इच्छा होती, की अमिताभ बच्चन यांनी या घराचे संग्रहालयात रुपांतर करुन येथे हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी जतन कराव्यात
- पण अनुप यांच्या या मागणीकडे अमिताभ बच्चन यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या दोघांत वाद झाला होता.

पुढील स्लाईड्सवर बघा, बच्चन यांची फॅमिली TREE...
बातम्या आणखी आहेत...