आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानुषी आहे भारताची सहावी MISS WORLD, या 5 जणींनी यापूर्वी देशाला मिळवून दिला हा मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारताच्या मानुषी छिल्लरने शनिवारी मिस वर्ल्ड 2017 चा किताब आपल्या नावी केला. चीनमध्ये झालेल्या या सौंदर्य स्पर्धेत मानुषीने 118 स्पर्धकांना मात देत हा मान मिळवला. मुळची हरियाणाची असलेली 20 वर्षीय मानुषी दिल्लीत राहते. ती सोनीपतच्या मेडिकल कॉलेजची सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. तब्बल 17 वर्षांनंतर भारताला मिस वर्ल्डचा मान मिळाला आहे. मानुषीपूर्वी 2000 साली प्रियांका चोप्राने ही स्पर्धा आपल्या नावी केली होती. मानुषी भारताची सहावी मिस वर्ल्ड ठरली आहे.

 

यापूर्वी कोणत्या 5 सौंदर्यवतींनी भारताला हा मान मिळवून दिला, टाकुयात यावर एक नजर...  

 

ऐश्वर्या राय ठरली होती मिस वर्ल्ड
1994 साली मिस वर्ल्डचा किताब ऐश्वर्या रायने आपल्या नावी केला होता. वयाच्या 20 वर्षी ऐश्वर्या मिस वर्ल्ड ठरली होती. त्यावेळी ती आर्किटेक्टरची विद्यार्थिनी होती. मिस वर्ल्ड ठरल्यानंतर ऐश्वर्याने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. 1997 साली 'और प्यार हो गया' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती 'आ अब लौट चले' (1999), 'हम दिल दे चुके सनम' (1999), 'ताल' (1999), 'जोश' (2000), 'मोहब्बतें' (2000), 'धूम 2' (2006), 'गुरु' (2007) सह अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली. 'फन्ने खां' हा ऐश्वर्याचा आगामी चित्रपट असून तो 2018 साली रिलीज होणार आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यापूर्वी कोणकोणत्या सौंदर्यवतींना भारताला मिळवून दिला आहे मिस वर्ल्डचा मान... 

बातम्या आणखी आहेत...