आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीटी झाली 'अनुष्का', नंदिता झाली 'नगमा', या 11 दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बदलले Real Name

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबादः एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीला तिच्या ख-या नावाऐवजी सिनेमातील नावाने जास्त ओळखतात. अनुष्का हे तिचे ऑनस्क्रिन नाव आहे. पण तिचे खरे नाव स्वीटी शेट्टी असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक आहे. सिनेसृष्टीतील पदार्पणाच्यावेळी तिने नाव बदलले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी नाव बदलले. या यादीत अनुष्काशिवाय नयनतारा, नगमा, रंभा, जयाप्रदा, सिमरन, रोजा आणि भूमिका चावला या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.

या अनुष्का शेट्टीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रींची खरे नावे..

अनुष्का शेट्टी
7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या अनुष्काने 2005 साली 'सुपर' या तेलगू सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने साऊथमध्ये अनेक सिनेमांत अभिनय केला. तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 34 वर्षीय अनुष्काने बाहुबली व्यतिरिक्त Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरिज सारख्या हिट सिनेमांत काम केले आहे.

पुढे वाचा, डायना मरियम बनली 'नयनतारा' तर नंदिता झाली 'नगमा'...
बातम्या आणखी आहेत...