आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुत्ता हूं सूंघ लिया', हे आहेत 1700 Cr कमावणा-या 'बाहुबली 2'चे दमदार डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबादः दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी 100 दिवस पूर्ण केले आहेत. आजही या सिनेमाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. वर्ल्डवाइड या चित्रपटाची 17000 कोटींहून अधिकची कमाई झाली आहे. तेलुगू भाषेचा हा चित्रपट हिंदीत डब करण्यात आला आहे.  पण याचे संवाद ऐकताना हा एखादा दाक्षिणात्यपट असल्याचे मुळीच वाटत नाही.
 
मनोज मुंतशिर यांनी लिहिले सिनेमातील संवाद...
- सिनेमातील हिंदी व्हर्जनचे संवाद मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. तर तेलगू सिनेमासाठी मदन कार्की, मल्याळमसाठी मंकोम्बू गोपालकृष्णन आमि तामिळसाठी  सी एच विजय कुमार यांनी संवाद लेखन केले आहे.

कोण आहेत मनोज मुंतशिर
- 41 वर्षीय मनोज मुंतशिर गीतकार आणि टीव्ही रायटर आहेत.
- अमेठी, उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या मनोज यांनी 'एक विलेन' सिनेमातील 'गलियां..', 'रुस्तम'मधील 'तेरे संग यारा' आणि 'वजह तुम हो'चे शीर्षक गीत लिहिले आहे.
- मनोज यांनी 'बाहुबली : द बिगनिंग' या सिनेमाचे डायलॉग्स आणि साँग्स लिहिले होते.
 
सिनेमातील हे आहेत मुख्य पात्र...

पात्र : अमरेंद्र/महेंद्र बाहुबली
अॅक्टर :प्रभास
- प्रभास तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार आहे. हिंदी प्रेक्षकांमध्ये तो 'बाहुबली : द बिगनिंग'(2015) या सिनेमामुळे लोकप्रिय झाला.
- यापूर्वी प्रभासने बॉलिवूडमध्ये अजय देवगण स्टारर 'अॅक्शन जॅक्सन'(2014) या सिनेमातील एका गाण्यात कॅमिओ केला होता.
 
पात्र : भल्लालदेव
अॅक्टर : राणा दग्गुबती
- तेलगू फिल्म 'लीडर'(2010) द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणा-या राणाने 'बाहुबली'पूर्वी बॉलिवूडमध्ये 'दम मारो दम'(2011), 'डिपार्टमेंट'(2011), 'ये जवानी है दीवानी'(2013) आणि 'बेबी'(2015) या सिनेमांत काम केलंय.
 
पात्र : देवसेना
अॅक्ट्रेस :अनुष्का शेट्टी

- अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 
-  दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनुष्काने 'रगडा'(2010), 'सिंघम'(2010), 'सिंघम2'(2013) आणि 'रुद्रमादेवी'(2015) या सिनेमांमध्ये काम केले.
 
पात्र : कटप्पा
अॅक्टर : सत्यराज

- सत्यराज तेलगु सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी तामिळ, मल्याळम आणि कन्नडसह अनेक भाषांमधील सिनेमांमध्ये काम केले. 
- 'बाहुबली'पूर्वी शाहरुख खान स्टारर बॉलिवूड फिल्म 'चेन्नई एक्स्प्रेस' (2013)मध्ये त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती.  
 
पात्र : बिज्जलदेव
अॅक्टर : नासर

- तेलगु सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्याने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. 
- अक्षय कुमार स्टारर 'राऊडी राठोड'(2012) या सिनेमात त्यांनी व्हिलन बापजीची भूमिका साकारली होती.
 
पात्र : शिवगामी
अॅक्ट्रेस : राम्या कृष्णन

- राम्याने 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. यामध्ये 10 बॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे.
- बॉलिवूडमध्ये 'दयावान'(1988), 'परंपरा' (1993), 'शपथ' (1997), 'बडे मियां छोटे मियां' (1998) आणि 'वजूद'(1998) या सिनेमांमध्ये राम्याने काम केलंय. 
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, या सिनेमातील 20 डायलॉग्स...
बातम्या आणखी आहेत...