आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे 'देवसेना', असे आहे CAR कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बाहुबली' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेमागचे कारण म्हणजे ओव्हरवेटमुळे तिला आगामी 'साहो' या सिनेमातून काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 'साहो'मध्ये अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. ‘बाहुबली 2’मध्ये देवसेनाच्या रूपात अनुष्का देसी अवतारात दिसली होती. पण ‘साहो’मध्ये ती मॉडर्न लूकमध्ये दिसणार, अशी चर्चा होती. या भूमिकेसाठी अनुष्का बरीच मेहनत घेत असल्याचीही चर्चा होती. मात्र, आता ‘साहो’मधून अनुष्काला काढण्यात आल्याचे कळते. केवळ वजन कमी न झाल्यामुळे अनुष्काला सिनेमातून काढण्यात आल्याची चर्चा आहे. अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 
 
‘बाहुबली द कन्क्लुजन’नंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी या जोडीचा हा दुसरा सिनेमा ठरला असता. पण आता अनुष्का खरंच या सिनेमाच भाग असणार की नाही, हे येणा-या काळात स्पष्ट होईल. खरं तर एखादा सिनेमा अनुष्काच्या हातून गेला तरी त्याचा फारसा फटका तिला बसेल असे वाटत नाही. कारण नेटवर्थियरच्या रिपोर्टनुसार, अनुष्का 22 मिलियन डॉलर (सुमारे 140 कोटी रुपये) संपत्तीची मालकिण आहे.

- हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरातील वुड्स अपार्टमेंटच्या 6th फ्लोअरवर अनुष्काचे आलिशान घर आहे.
- अनुष्का एका सिनेमासाठी सुमारे  4 ते 5 कोटींच्या घरात मानधन घेते.
- लग्झरी कारची आवड असलेल्या अनुष्काजवळ अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कार आहेत. बीएमडब्ल्यू 6, ऑडी A6, ऑडी Q5 आणि टोयोटा कोरोला या लग्झरी गाड्या तिच्या कलेक्शनमध्ये आहेत.
 
अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करते अनुष्का...
- अनुष्का एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाइल, कोलगेट अॅक्टिव सॉल्ट आणि डाबर आंवला या मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे.
- अनुष्का शेट्टीने तिच्या ड्रायव्हरला सुमारे 12 लाखांची कार गिफ्ट केली होती.  

या सिनेमांमध्ये झळकली आहे अनुष्का...
अनेक तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये झळकलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेल्या अनुष्काने 2005 साली रिलीज झालेल्या 'सुपर' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 34 वर्षीय अनुष्का 'बाहुबली'सोबतच Vikramarkudu (2006), अरुंधति (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम सीरीजच्या हिट सिनेमांमध्ये झळकली आहे.

पु़ढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का शेट्टीचे कार कलेक्शन...  
बातम्या आणखी आहेत...