आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का, शेकडो कोटी कमावणाऱ्या चित्रपटांची किती तिकिटे विकली जातात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये कोणत्याही चित्रपटाच्या सुपरहिट किंवा फ्लॉप होण्याचा अंदाज बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाचा परफॉर्मन्स आणि कमाईवरून केला जातो. चित्रपट किती स्क्रीन्सवर रिलीज झाला आणि थिएटरमध्ये चित्रपट पाहायला किती लोक आले याची माहिती शक्यतो उपलब्ध नसते. 90 च्या दशकात रिलीज झालेले असे अनेक चित्रपट आहेत जे ब्लॉकस्टर ठरले आहेत. पण या पॅकेजमध्ये आपण चित्रपटांचे यश त्यांच्या कमाईवरून नव्हे तर तिकिटांच्या विक्रीवरून जाणून घेणार आहोत. 

हम आपके है कौन (1994)
राजश्री प्रोडक्शनचा म्युझिक रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'हम आपके है कौन' हा 1982 मधील याच बॅनरच्या 'नदिया के पार'सारखाच होता. सलमान-माधुरी स्टारर हा चित्रपटा नव्या पिढीसाठी तयार करण्यात आला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. एवढेच नाही, कमाईबरोबरच तिकिट विक्रीतही या चित्रपटाने विक्रम केला होता. 100 कोटी क्लबमध्ये जाणारा सलमान खानचा हा पहिला चित्रपट होता. 

शोले (1975)
बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेला 'शोले' हा सर्वाधिक चाललेलाच नव्हे तर कमाईतही त्या काळातील मोठा चित्रपट होता. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही लोकांना या चित्रपटाचे कॅरेक्टर्स डायलॉग तोंडी पाठ आहेत. या चित्रपटाच्या 5 कोटी 52 लाख हून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तिकिट विक्रीत आघाडीवर असलेल्या इतर चित्रपटांबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...