आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीने केली मुलीचे बारसे, नाव ठेवले 'निशा', जाणून घ्या 22 Starच्या मुलांच्या नावांचा अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डेनिअल वेबर या दोघांनी अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. ते म्हणजे, या दाम्पत्याने मुलगी दत्तक घेतली आहे. लातूरमधील 21 महिन्यांची गोंडस मुलीचे सनी लियोनी डेनिअल हे आई-बाबा झाले आहेत.  बहुतांश पालक मुलगा दत्तक घेतात. पण आम्ही मुलगी दत्तक घेतली आहे. निशा हिला आम्ही नाही तर तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मुलीचे ठेवले नाव 'निशा'... 
सनीने मुलीचे नामकरणही केले आहे. तिचे नाव नि‍शा कौर वेबर असे ठेवले आहे. निशाचा अर्थ 'रात्र' असा होतो. सनी लिओनी मुळ पंजाबी वंशाची आहे. तिचे खरे नाव करणजीत कौर असे आहे. तिचे लग्न डॅनियल वेबरसोबत झाले आहे. गेली सहा वर्षे दोघांचा सुखी संसार सुरु आहे. त्यामुळे दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावात कौर आणि वेबर ही नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे निशा कौर वेबर असे मुलीचे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे.
 
या सेलेब्सच्या मुलांची नावेसुद्धा आहेत युनीक...
आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. आराध्या, नितारा, आझाद, अबराम, शाहरान, सायरा, वियान ही बी टाऊनच्या अभिनेत्यांच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे.

सेलिब्रिटी किड्सच्या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....