आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 कोटींचा आहे शाहरुखचा \'मन्नत\', जाणून घ्या स्टार्सच्या बंगल्यांच्या किंमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे केवळ मुंबईतच नव्हे तर देशाबाहेरसुद्धा आलिशान बंगले आहेत. त्यांच्या एका फ्लॅट आणि बंगल्याची किंमत कोटींच्या घरात आहे. बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानचा मन्नत बंगला त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिया आहे. दूरुनदूरुन लोक शाहरुखच्या मन्नतची एक झलक डोळ्यांत साठवण्यासाठी मुंबईत येत असतात. ईदच्या दिवशी तर शाहरुखच्या मन्नतबाहेर लोकांची तुफान गर्दी जमत असते. शाहरुखदेखील बंगल्याबाहेर येऊन आपल्या चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत असतो. त्याच्या या घराची किंमत सध्या 200 कोटींच्या घरात आहे. गुजरातचे पारसी किकू गांधी यांच्या मालकीचा हा बंगला होता. शाहरुखने यांच्याकडून हा बंगला 15 कोटींना खरेदी केला होता. 
 
मुंबईतील बॅण्ड स्टॅण्ड, वांद्रा (पश्चिम) स्थित शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात सहा मोठे फ्लोअर आहेत. शाहरुखच्या या बंगल्यात मोठे ड्रॉइंग रुम, जिम, लायब्ररी आणि त्याचे ऑफिस आहे. बेसमेंटमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
 
नोटः सर्व स्टार्सच्या बंगल्याच्या किंमती कोट्यवधीच्या घरात आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीरुन हे पॅकेज तयार करण्यात आले आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अमिताभ बच्चन, आमिर खान, शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांच्या बंगल्यांच्या किंमती...
बातम्या आणखी आहेत...