आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहर आहे 1280 कोटींच्या संपत्तीचा मालक, दोन घर आणि आहेत अनेक लग्झरी कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने नुकतीच वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 मे 1972 रोजी मुंबईत जन्मलेल्या करणने 1998 साली आलेल्या ‘कुछ-कुछ होता है’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. अलीकडेच रिलीज झालेल्या 'बाहुबली 2' या सिनेमाचे हिंदी व्हर्जनचे हक्क खरेदी केले आहेत. सिनेमाच्या चांगल्या कमाईमुळे करणला मोठा फायदा झाला आहे. नेटवर्थियर आणि द रिचेस्टनुसार करण जोहरजवळ 1280 कोटींची संपत्ती आहे. यापैकी 480 कोटी रुपयांची त्याने गुंतवणूक केली आहे.  

आकड्यांनुसार, निर्मितीमधून करणच्या संपत्तीत 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय जाहिराती आणि टीव्ही शोजमधून त्याची कमाई होत असते. 
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सांगतोय, करण जोहरच्या संपत्तीविषयी...  

निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे करण...
2004 मध्ये वडील यश जोहर यांच्या निधनानंतर करण जोहरने धर्मा प्रॉडक्शनची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. निर्माता म्हणून करणचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. यामध्ये ‘कल हो ना हो’, ’दोस्ताना’, ’आय हेट लव स्टोरी’, ’अग्निपथ’, ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.  

अभिनयात आजमावला हात...
करणने  दिग्दर्शन आणि निर्मितीसोबत अभिनय क्षेत्रातही हात आजमावला आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'ओम शांति ओम', 'फॅशन', 'लक बाय चान्स' आणि अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमांमध्ये करण अभिनय करताना दिसला आहे.

 पुढील स्लाईड्सवर वाचा, करण जोहरच्या घर आणि कार कलेक्शनविषयी...   
बातम्या आणखी आहेत...