आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात नव्हे या देशात झाला कतरिना, सनी लिओनीसह या 11 अॅक्ट्रेसेसचा जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमधील अनेक अभिनेंत्रीचा जन्म भारतात नव्हे तर परदेशात झाला आहे. यापैकीच एक नाव आहे कतरिना कैफ. कतरिनाने 16 जुलै रोजी वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. 1983 साली हाँगकाँगमध्ये तिचा जन्म झाला. वयाच्या 14 व्या वर्षी कतरिनाने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी तिने पहिल्यांदा मॉडेलिंग केली होती. दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी एका फॅशन शोमध्ये कतरिनाला पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिला 'बूम' (2003) या सिनेमासाठी साइन केले. सिनेमा फ्लॉप ठरला, पण कतरिनासाठी बॉलिवूडची दारं उघडी झाली. त्यानंतर कतरिनाने 'मैंने प्यार क्यूं किया' (2005), 'हमको दीवाना कर गए' (2006), 'नमस्ते लंदन' (2007), 'पार्टनर' (2007), 'वेलकम' (2007), 'रेस' (2008), 'राजनीती' (2010), 'धूम-3' (2013) 'बार बार देखो' (2016) सह अनेक सिनेमे केले. नुकताच तिचा 'जग्गा जासूस' हा सिनेमा रिलीज झाला आहे.
 
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांचा जन्म भारतात नव्हे तर परदेशात झाला...   
बातम्या आणखी आहेत...