आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे \'देवसेना\', असे आहे CAR कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘बाहुबली’ प्रभास आणि ‘देवसेना’ म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांची एक आनंदाची बातमी आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे दोघे साखरपुडा करणार असल्याची बातमी आहे. अनुष्काने याचसाठी आपले वाढलेले वजन कमी केल्याचेही बोलले जात आहे. ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर अनुष्का आणि प्रभासच्या लिंकअपच्या बातम्यांनी प्रचंड जोर धरला होता. पण प्रत्येकवेळी प्रभास आणि अनुष्का यांनी या बातम्या नाकारल्या. आम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे दोघेही सांगत आले. पण आता पुन्हा एकदा दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

विशेष म्हणजे प्रभासच्या आगामी 'साहो' या चित्रपटासाठी सुरुवातीला अनुष्कालाच साइन करण्यात आले होते. पण ओव्हरवेटमुळे तिला  या चित्रपटातून बाहेर करण्यात आले आणि तिच्याऐवजी श्रद्धा कपूरची वर्णी चित्रपटात लागली. खरं तर एखादा सिनेमा अनुष्काच्या हातून गेला तरी त्याचा फारसा फटका तिला बसेल असे वाटत नाही. कारण नेटवर्थियरच्या रिपोर्टनुसार, अनुष्का 22 मिलियन डॉलर (सुमारे 140 कोटी रुपये) संपत्तीची मालकिण आहे.

आलिशान घर... 
- हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरातील वुड्स अपार्टमेंटच्या 6th फ्लोअरवर अनुष्काचे आलिशान घर आहे.
- अनुष्का एका सिनेमासाठी सुमारे 4 ते 5 कोटींच्या घरात मानधन घेते.
- लग्झरी कारची आवड असलेल्या अनुष्काजवळ अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कार आहेत. बीएमडब्ल्यू 6, ऑडी A6, ऑडी Q5 आणि टोयोटा कोरोला या लग्झरी गाड्या तिच्या कलेक्शनमध्ये आहेत.

अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करते अनुष्का...
- अनुष्का एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाइल, कोलगेट अॅक्टिव सॉल्ट आणि डाबर आंवला या मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे.
- अनुष्का शेट्टीने तिच्या ड्रायव्हरला सुमारे 12 लाखांची कार गिफ्ट केली होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अनुष्का शेट्टीविषयी A to Z आणि सोबतच बघा, तिचे कार कलेक्शन... 
बातम्या आणखी आहेत...