Home »Gossip» Nagarjuna Daughter In Law Says I Will Prefer Sex Over Food

नागार्जुनच्या सूनेचे बोल्ड स्टेटमेंट, म्हणाली - 'खाण्यापेक्षा सेक्सला प्राधान्य देईल'

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 10:29 AM IST


मुंबईः दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांची भावी सून समांथा रुथ प्रभू हिने अलीकेडच 'JFW' या फॅशन मॅगझिनसाठी एक बोल्ड फोटोशूट केले आहे. समांथाने या फोटोशूटसोबतच मुलाखतीत बोल्ड स्टेटमेंट देऊन चर्चा एकवटली आहे. समांथाला जेव्हा सेक्स आणि फूडपैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले, तेव्हा तिने बिनधास्तपणे सेक्सला पसंती दिली. इतकेच नाही तर सेक्ससाठी उपाशी राहण्याचीसुद्धा तिने तयारी दर्शवली आहे.
40 दिवस समांथा साजरा करणार आहे हनीमून...
- समांथा ही दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांची भावी सून आहे. नागार्जुन यांचा मुलगा चैतन्यसोबत येत्या 6 ऑक्टोबर रोजी समांथाचे लग्न होणार आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने होणार आहे. या लग्नाचा कार्यक्रम गोवामध्ये तीन दिवस चालणार आहे. यानंतर समांथा आणि नागा 40 दिवसांच्या हनीमूनवर जाणार आहेत.
- समांथा आणि चैतन्य हे दोघेही ट्रॅवलिंगचे शौकीन आहेत आणि लग्नानंतर फिरणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असणार आहे.
- हे दोघे त्यांचा बहुतेक वेळ न्यूयॉर्कमध्ये घालवणार आहेत. येथेच समांथाच्या 'ये माया चेसावे' (2010) चित्रपटाचे शूटिंग झाले होते.
- हनीमूनवरुन परतल्यानंतर समांथा शिवकार्तिकेयन यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे.
- समांथा यावर्षी 'राजू गरी गढी 2' मध्येही दिसणार आहे. यात सासरे नागार्जूनही तिच्यासोबत काम करत आहेत. 2015 साली आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, सेक्सविषयी 15 बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेली बिनधास्त वक्तव्ये...

Next Article

Recommended