आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहो'साठी प्रभास घेणार तब्बल 30 कोटी मानधन, इतकी आहे इतर साऊथ अॅक्टर्सची फीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब्लॉकस्टर चित्रपट  'बाहुबली' च्या यशानंतर सर्वच चित्रपट निर्माते प्रभाससोबत काम करु इच्छित आहेत. इतकेच नाही तर प्रभासची वाढती पॉप्युलॅरीटी पाहता बॉलिवूडमध्येही प्रभासची क्रेझ आहे. 'बाहुबली 2' चित्रपटासाठी प्रभासने 20 ते 25 कोटी रुपये चार्ज केले होते. पण आता त्याची वाढती डिमांड पाहता आता प्रभासने त्याची फीस वाढवली आहे. आता अशी बातमी आहे की, साहो साठी प्रभासनेचब्बल 30 कोटी रुपये चार्ज केले आहे. 
 
- एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने 'साहो'साठी तब्बल 30 कोटी रुपये चार्ज केले आहेत. 
- साहो चित्रपट तेलुगु, तामिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. 
- साहो चे चित्रीकरण हैदराबाद, मुंबई, अबुधाबी, बुडापेस्ट येथे सुरु आहे. 
- या चित्रपटासाठी CGI आणि VFX टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे. 
- चित्रपटासाठी प्रभासची हिरोईन म्हणून श्रद्धा कपूरचे नाव फायनल करण्यात आले आहे. 
- चित्रपटात नील नीतीन मुकेशही आहेत. 
 
श्रद्धाअगोदर अनुष्का शेट्टी होती फायनल..
- श्रद्धा कपूरअगोदर अनुष्का शेट्टी या चित्रपटा होती. पण वाढत्या वजनाने तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले.
- अनुष्कानंतर अनेक हिरोईन्सचे नाव समोर आले आणि शेवटी श्रद्धाचे नाव फायनल करण्यात आले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, साऊथच्या इतर स्टार्स एका चित्रपटासाठी किती घेतात फीस..
बातम्या आणखी आहेत...