मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज चित्रपटक्षेत्रात 42 वर्षे पूर्ण केलेली आहेत. रजनीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे. उत्साही, नम्र असे रजनीकांत यांना आज संपूर्ण जग थलाईवा म्हणून ओळखते. पण हे थलाईवा केवळ अॅक्शन हिरो नाही. त्यांना खऱ्या आयुष्यातील प्रेमही फार फिल्मी पद्धतीने झाले होते. आज त्यांच्या लग्नाला 36 वर्षाचा काळ लोटला आहे. रजनीकांत यांच्या पत्नीचे नाव लता असून त्या समाजसेविका म्हणून काम करतात. एक शाळाही त्या चालवतात. कॉलेजमध्ये असताना त्यांचे रजनीकांत यांच्याशी प्रेम जुळले होते.
रजनीकांत यांच्या पत्नी लता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतात. या दाम्पत्याच्या लग्नाला 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट कशी झाली, ते लग्नाच्या बेडीत कसे अडकले, याविषयी कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक नसावे. ते आपण आज या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवरून जाणून घेऊया रजनीकांत आणि लता यांच्या लव्हस्टोरीविषयी..