आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड स्टार्सची 1st कमाई : बॅकग्राउंड डान्ससाठी सलमानला मिळाले होते 75 रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बिग बॉस'चे 11वे पर्व 1 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीझनसाठी सलमान खान तब्बल 11 कोटी (दोन एपिसोड्ससाठी) रुपये मानधन घेतोय. पण सलमान खानची पहिली कमाई ही केवळ 75 रुपये असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? एका इव्हेंटमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सलमानला हे पैसे मिळाले होते. याचा खुलासा स्वतः सलमान खानने एका मुलाखतीत केला आहे. 

काय म्हणाला होता सलमान खान...
- सलमान खानने सांगितले, "मला आठवतंय की, माझी पहिली कमाई ही 75 रुपये होती. हॉटेल ताजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. माझा एक मित्र या कार्यक्रमात परफॉर्म करणार होता. तो मला त्याच्यासोबत तेथे घेऊन गेला होता."
- सलमान खानने पुढे सांगितले, "नंतर मला कॅम्पा कोलाच्या जाहिरातीसाठी 750 रुपये मिळाले होते. त्यानंतर एका कामासाठी मला 1500 रुपये मिळाले होते. तर 'मैंने प्यार किया'साठी मला 31 हजार रुपये मिळणार होते. पण नंतर ते वाढवून 75 हजार रुपये मला देण्यात आले होते."

सलमान खानव्यतिरिक्त इतर बॉलिवूड स्टार्सची पहिली कमाई किती होती, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...