आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

400 कोटींमध्‍ये बनत आहे हा सिनेमा, जाणून घ्‍या साऊथचे टॉप-10 बिग बजेट सिनेमे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेनमेंट डेस्‍क - रजनीकांत आणि अक्षय कुमारची मुख्‍य भूमिका असलेला '2.0' सिनेमा भव्‍य बजेटमुळे चर्चेत आहे. सिनेमाचे जवळपास 400 कोटी रुपयांचे बजेट आहे. दक्षिणेच्‍या या सिनेमाचे बजेट ऐकून बॉलिवूडचे निर्मातेदेखील आश्‍चर्यचकीत आहेत. बॉलिवूडमधील ट्रेंड अॅनालिस्‍टनुसार '2.0' हा भारताचा आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा सिनेमा आहे. याचे कारण सिनेमात वापरण्‍यात आलेले अत्‍याधुनिक VFX तंत्रज्ञान आहे. हा सिनेमा  पुढील वर्षी म्हणजे 25 जानेवारी 2018 रोजी रिलीज होणार आहे. 


टॉप-10 सिनेमांमध्‍ये रजनीकांतचे चार सिनेमे
'2.0' व्‍यतिरिक्‍त साऊथमध्‍ये असे आणखी सिनेमे आहेत, ज्‍यांना बनविण्‍यासयाठी कोटयावधींचा खर्च आला आहे. टॉप-10 महागड्या सिनेमांमध्‍ये बाहुबलीचे दोन पार्ट आणि रजनीकांतच्‍या तीन सिनेमांचा समावेश आहे. '2.0' व्‍यतिरिक्‍त 'एंथिरन', 'कोच्चाडियन' आणि 'कबाली' या रजनीकांतच्‍या या सिनेमांचा लिस्‍टमध्‍ये समावेश आहे.


'2.0'चे बजेट वाढण्‍याची कारणे
- या सिनेमासाठी अक्षय कुमारने जवळपास 45 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. सिनेमात तो व्हिलनच्‍या भूमिकेत आहे. 
- अॅक्‍शन दृश्‍यांना चित्रित करण्‍यासाठी कित्‍येक आतंराराष्‍ट्रीय अॅक्‍शन डायरेक्‍टर आणि एक्‍सपर्ट्स यांची मदत घेतली आहे. सिनेमाच्‍या क्‍लायमॅक्‍समधील रजनीकांत आणि अक्षय कुमारच्‍या फाइटसीनसाठी जवळपास 20 कोटींचा खर्च आला आहे. 
- अक्षयच्‍या मेकअपसाठी 3 तास आणि त्‍याला काढण्‍यासाठी 1 तास वेळ लागतो. अक्षय कुमारच्‍या फक्‍त मेकअपचा खर्च 4 कोटी आहे. 
- सिनेमाच्‍या प्रमोशनसाठी निर्मात्‍यांनी 40 कोटींचे बजेट ठेवले आहे.


पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्या, साऊथच्या सर्वाधिक महागड्या आणखी 9 सिनेमांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...