या आठवड्यातील Top 5 न्यूज जाणून घ्या..
नवाजचे वडिलोपार्जित घर पडद्यावर
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना या छोट्या गावामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचे लहानपण गेले. ज्या घरात अॅक्टर होण्याचे त्याने स्वप्न पाहिले, त्या घरी शूटिंग करण्याचे नवाजला भाग्य लाभले आहे.
एका टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या शोसाठी नवाजुद्दीन सिद्दिकीने काही दिवसांपूर्वी बुढाना या आपल्या मूळ गावी शूटिंग केली. याबाबत नवाजने सांगितले की, 'या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये माझ्या आठवणी दडलेल्या आहेत. याच घरामध्ये मी पहिल्यांदा अॅक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, इतक्या लवकर माझे हे स्वप्न पूर्ण होईल असे मला वाटले नव्हते. अनेक लोकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी आज यशाच्या शिखरावर उभा आहे.' शूटिंग वेळी नवाजने घरातील एका भिंतीवर आपल्या लहानपणासून ते आतापर्यंतची अनेक छायाचित्रे लावली होते. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवाजला एकूण नऊ भाऊ-बहीण आहेत.
पुढे वाचा, कतरिना कैफ, कंगना-इम्रान स्टारर कट्टी बट्टी सिनेमा, सोनाक्षी सिन्हा आणि बाहुबली या सिनेमाशी निगडीत बातम्या...