आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज आहे अनुष्काच्या BFचा बर्थडे, विराटच्या घरापासून 17 KM दूर आहे अनुष्काचा Lavish फ्लॅट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात अनुष्का शर्माच्या अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. अनुष्कामुळे विराटच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि मुख्य म्हणजे तिच्यामुळे आयुष्यात स्थिरता आल्याचं तो सांगतो. ‘माझ्या आयुष्यात असलेल्या त्या व्यक्तीची ही जादू आहे. तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत माझ्यात चांगले बदलसुद्धा झाले आहेत. शांतपणे गोष्टी कशा हाताळता येतात, आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करावा, हे सर्व तिने मला शिकवलं,’असं तो म्हणाला. विशेष म्हणजे आज विराटचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहे.
 
केवळ 17 किलो मीटर दूर आहे विराटच्या घरापासून अनुष्काचे घर.. 
वरळी (मुंबई) येथे असलेल्या ‘ओमकार 1973’ या अपार्टमेंटमध्ये विराटचा आलिशान फ्लॅट आहे. तर विराटच्या या घरापासून 17 किलोमीटर अंतरावर अनुष्काचे घर आहे. सेव्हन अंधेरी बंगलोस्थित बद्रीनाथ टॉवर येथे अनुष्का वास्तव्याला आहे. बद्रीनाथच्या 20 व्या मजल्यावर अनुष्काचा फ्लॅट आहे.
 
तसे पाहता, अनुष्का आपले खासगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवते. याच कारणामुळे सामान्य लोकांना तिच्या घराची झलक बघणे अशक्य आहे. अनुष्काचे घर बघितले असता, तिला कॅमे-याची विशेष आवड असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे तिच्या घरात प्रवेश करताच कॅमे-याची एक मोठी पेंटिंग बघायला मिळते. अनुष्काने आपले घर अतिशय उत्कृष्टरित्या सजवले आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अनुष्काच्या आलिशान फ्लॅटची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...