आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफच्या मुलीसोबत दिसला शाहरुखचा मुलगा, करण जोहरच्या पार्टीचे 21 Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत दिसतोय. उजवीकडे वर - तनुज गर्गसोबत श्वेता नंदा आणि मोहित सुरी, खाली - वरुण धवनला किस करताना करण जोहर - Divya Marathi
अभिनेता शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत दिसतोय. उजवीकडे वर - तनुज गर्गसोबत श्वेता नंदा आणि मोहित सुरी, खाली - वरुण धवनला किस करताना करण जोहर
एन्टरटेन्मेंट डेस्कः निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता करण जोहरने गुरुवारी (25 मे) वयाची 45 वर्षे पूर्ण केली. रुही आणि यश या जुळ्या मुलांच्या आगमनाने करणसाठी यंदाचा वाढदिवस अतिशय स्पेशल ठरला. यावर्षीच मार्च महिन्यात करणच्या या जुळ्या मुलांचा जन्म झाला. नुकत्याच बाबा झालेल्या करणला त्याच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या आलिया भटने वाढदिवशी 'डॅडी ऑफ द इयर' हा किताब दिला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने करणने एक जंगी पार्टी दिली. या पार्टीत सुमारे 100 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले. या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींनी पार्टीतील बरेच फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.  करणच्या पार्टीत दीपिका-कतरिनासह पोहोचल्या त्याच्या आगामी 'हीरोईन्स'
 

या पार्टीत अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलगा आर्यनसोबत सहभागी झाला होता. पार्टीतील शाहरुखचा त्याचा मुलगा आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारासोबतचा एक फोटो समोर आला आहे. शिवाय बाहुबली या सिनेमात भल्लादेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबतीसुद्धा करणला बर्थडे विश करायला पोहोचला होता. त्याचाही करण आणि रवीना टंडनसोबतचा पार्टीतील फोटो बघायला मिळतोय. यासह सेलिब्रिटींनी पार्टीत क्लिक केलेले सेल्फीसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  Mother of All Bashes: करणच्या पार्टीत अवतरले तारांगण, 100 हून अधिक सेलेब्स आले एकत्र
 

चला तर मग एकुणच कसा होता  करणच्या आलिशान पार्टीतील आतील नजरा, बघा खास छायाचित्रांच्या माध्यमातून... PICS: करणच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचले सिद्धार्थ-वरुण, हे सेलेब्सही दिसले जोडीदारासोबत
बातम्या आणखी आहेत...