मुंबई: गतकाळातील अभिनेते मिथुन चक्रवर्ती 66 वर्षांचे झाले आहेत. 16 जून 1950 रोजी त्यांचा जन्म कोलकात्यात झाला. मिथुन यांचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती होते. आज जवळपास 240 कोटींच्या मालमत्तेचे मालक मिथुन अभिनेत्यासोबत 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चेसुद्धा मालक आहेत. तामिळनाडूच्या ऊटी, मसिनागुडी आणि कर्नाटकच्या मैसूरमध्ये त्यांचे लग्झरी हॉटेल्स आहेत.
काय आहे मिथुन यांच्या हॉटेल्सचे वैशिष्ट...
मोनार्क हॉटेल्सची ऑफिशिअल वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ऊटी स्थित हॉटेलमध्ये 59 खोल्या, 4 लग्झरी सुइट्स, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाइट काऊ बॉय बार अँड डिस्कोसह किड्स कॉर्नरसह अनेक सुविधा आहेत.
जर मसिनागुडीविषयी बोलायचे झाले तर येथे 16 एसी बंगले, 14 टि्वन्स मचान्स, 4 स्टँडर्ड रुम, मल्टीकुशीन रेस्तरॉ आणि चिल्ड्रेन प्ले ग्राऊंडसह हॉर्स रायडिंग आणि जीपमधून जंगल्यात राइड करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय, येथे नॉन एसी मचान, बंगले आणि कॉटेजसुद्धा आहेत.
मैसूर स्थित हॉटेलमध्ये फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ओपन एअर मल्टीकुशीन रेस्तरॉसह स्विमिंग पूल, पूल टेबल आणि ट्रॅव्हल रिलेटेड सर्व्हिसेससुध्दा उपलब्ध आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉटेल्सचे Inside Photos...
नोट : सर्व PHOTOS mithunhotels.comवरून घेण्यात आले आहेत.