आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे प्रियांका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर, बघा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील लिविंग एरियात  प्रियांका चोप्रासोबत अनुपमा चोप्रा्रा - Divya Marathi
घरातील लिविंग एरियात प्रियांका चोप्रासोबत अनुपमा चोप्रा्रा
मुंबईः बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा याकाळात क्वांटिकोच्या दुस-या सीझनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. न्यूयॉर्कच्या या इंटरनॅशनल शोचे शूटिंग करणा-या प्रियांकाची भेट अलीकडेच चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रासोबत झाली. अनुपमा फिल्म कॅम्पेनियन अंतर्गत प्रियांकाची मुलाखत घ्यायला तिच्या न्यूयॉर्कच्या घरी पोहोचल्या होत्या. मुलाखतीत प्रियांकाने सांगितले, की तिचे घर मालिकेच्या शूटिंग सेटपासून 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर आहे.

शोसाठी दररोज 15 तास काम करते प्रियांका...
प्रियाकांने मुलाखतीत उघड केले, की 'क्वांटिको'साठी तिला दररोज 15-15 तास काम करावे लागते. बॉलिवूड आणि अमेरिकन सिनेमाच्या व्याकरण आणि भाषेत फारसा फरक नसल्याचेही तिने सांगितले. मात्र कामाचे तास जास्त असल्याने टीव्ही इंडस्ट्रीत काम करणे थोडे कठीण जाते. क्वांटिकोमधील भूमिका मोठी असल्याने दररोज काम करावे लागत असल्याचेही ती म्हणाली. प्रियांका विकेण्डला प्रमोशनल इव्हेंट्समध्ये बिझी असते. न्यूयॉर्कमधील प्रियांकाचे हे घर भाड्याचे असून तेथील अतिशय पॉश एरियात स्थित आहे.

प्रियांकाच्या न्यूयॉर्कच्या घराचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...