आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे सैफ-करीनाचा आलिशान 'पतौडी पॅलेस', बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हरियाणामधील गुडगांव येथून 26 किलोमीटर दूर असलेल्‍या पतौडी येथे लखलखणारा हा महाल म्‍हणजे पतौडी परिवाराची निशाणी पतौडी पॅलेस आहे. 200 वर्षांहून मोठा इतिहास या परिवाराला लाभला आहे. पण हा महाल 80 वर्षापुर्वीचाच आहे. 8 वे नवाब आणि भारतीय टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी 1935 मध्‍ये हा महाल बांधला होता. त्‍यानंतर 9 वे नवाब मंसूर अली उर्फ नवाब पतौडी यांनी विदेशी आर्किटेक्‍टच्‍या मदतीने या महालाची आकर्षक डिझाइन केली. या नवाबाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याची सुन आणि सैफ अली खानची पत्‍नी करीना आता हा महाल सांभाळत आहेत.
सैफच्‍या या घरात मंगल पांडे, वीर-जारा आणि रंग दे बसंती सारख्‍या काही बॉलिवूड सिनेमांची शुटिंगही झाली आहे. या महालात भलीमोठी ड्रॉइंग रूम व सात बेडरूम, ड्रेसिंग रूम आहेत. महालाचे डिझाइन एखाद्या राजवाड्यासारखे आहे. ऑस्‍टेलियाचे आर्किटेक्‍ट कार्ल मोल्‍ट हेंज यांच्‍या सहकार्यातून या महलाची डिझाइन करण्‍यात आली. आता अभिनेता सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सैफीनाच्या पतौडी पॅलेसची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...