आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: असे दिसते सलमानचे फार्म हाऊस, शूटिंगसोबत येथे एन्जॉय करतो पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खान आपल्या कुटुंबासोबत लवकरच नवीन घरी शिफ्ट होणार असल्याची बातमी आहे. गेल्या 40 वर्षांपासून सलमान वांद्र्यातील (मुंबई) गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होता. मात्र मीडियात आलेल्या लेटेस्ट न्यूजनुसार, आता वांद्र्यातील लिकिंग रोडस्थित लिटील टॉवर हा सलमानच्या घराचा नवीन पत्ता आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटसोबतच सलमानचे पनवेल येथील फार्म हाऊससुद्धा प्रसिद्ध आहे.

150 एकरात पसरले आहे फार्म हाऊस...
पनवेल स्थित सलमानचे फार्महाऊस पार्टी आणि सोशल इव्हेंटसमुळे नेहमीच चर्चेत असते. सलमानच्या गाजलेल्या बजरंगी भाईजान या सिनेमाचे काही सीन्स याच फार्महाऊसमध्ये शूट झाले होते. सुल्तानसाठी याच ठिकाणी सलमानने ट्रेनिंग घेतले. नवी मुंबईतील पनवेल येथे असलेल्या या फार्म हाऊसचे नाव सलमानने अर्पिता फार्म्स असे ठेवले आहे. हे नाव सलमानच्या धाकट्या बहिणीच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. तब्बल 150 एकरात सलमानचे हे फार्म हाऊस आहे.

काय आहे वैशिष्ट्य...
अर्पिता फार्म्स 150 एकरात पसरले आहे. प्रवेशद्वारावरील बोर्डवर "A bird in bush is better than two on the plate." असे लिहिले आहे. सलमानला बाइकिंग आणि हॉर्स रायडिंग पसंत आहे. फार्म हाऊसमध्ये पाळीव प्राणी (विशेषतः घोडे) आहेत. त्यांच्या देखभालीसाठी एक मोठी जागा येथे आहे. सलमान आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर अनेकदा येथे घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसले आहेत. सलमानला येथे बाइक रायडिंगसोबत ATV गाडी चालवणे पसंत आहे. सलमान फिटनेस फ्रिक असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. याच कारणामुळे येथे अत्याधुनिक जिमसुद्धा तयार करणअयात आले आहे. शिवाय स्विमिंग एरियासुद्धा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहिल्यांदाच बघा सलमानच्या अर्पिता फार्म्सचे INSIDE PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...