आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात असा असतो सनी लिओनीचा अंदाज! बघा 10 Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सनी लियोनी जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री बनली तेव्हापासून तिचे खासगी आयुष्य मीडियात चर्चेत आहे. तिच्या घराचे अनेक फोटोजसुद्धा मीडियात समोर आले आहेत. या फोटोजमध्ये ती एकटी नव्हे तर नव-यासोबत पोझ देताना दिसते. रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही फोटोज तिच्या मुंबईस्थित घराचे तर काही भारताबाहेरील घराचे आहेत. मुंबईत सनीचे भाड्येच घर आहे. तर जर्मनीत तिचे स्वतःचे घर आहे. सनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर गर्भश्रीमंत असल्याचे सा-यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे भाड्याचे घर असो वा परदेशातील स्वतःचे नक्कीच आलिशान असणार, हे नक्की.
 
'बिग बॉस'नंतर झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री...
सनीने 2011 मध्ये कलर्स वाहिनीच्या 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. येथून तिला बॉलिवूडची दारं उघडी झाली. या शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. येथेच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली. मात्र सनीचा पदार्पणातला सिनेमा फ्लॉप ठरला. 'जिस्म 2' या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र हळूहळू सनी येथे स्थिरावली. 'जिस्म 2', 'जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला', 'कुछ-कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे', 'टीना और लोलो', 'वन नाइट स्टँड' हे तिचे सिनेमे आहेत. 
 
डेनिअलसोबत केले लग्न...
सनीचे आई-वडील हयात नाहीये. 2008मध्ये तिची आई आणि 2010मध्ये कॅन्सरमुळे तिच्या वडिलांचे निधन झाले. सनीचा भाऊ सनदीप यूएसच्या एका प्रसिध्द हॉटेलमध्ये शेफ आहे. सनीने एका मुलाखतीत सांगितले होते, की 2011 मध्ये ती डेनियल वेबरसोबत विवाहबद्ध झाली. The Disparrows म्यूझिकल रॉक बँडचा लीड गिटारिस्ट डेनिअल सनीचा मॅनेजरसुध्दा आहे. एकेकाळी डेनियलसुद्धा पोर्न स्टार होता. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सनीच्या मुंबई आणि जर्मनीतील घराचे इनसाइड फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...