आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सुपरस्टार रजनीकांतचा Bungalow, बघा आतून कसा दिसतो हा आशियाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कबाली' हा सिनेमा रिलीज झाला असून सिनेमाने छप्परफाड कमाई करत सुमारे अडीचशे कोटींचा गल्ला जमवला आहे. 'कबाली'ने केवळ तामिळनाडूमध्येच १०० कोटींचा गल्ला जमवला असल्याचे सांगितले जात आहे. तर इतर राज्यांतील कमाई दीडशे कोटी रुपये आहे. भारतात १२ हजार पेक्षा अधिक स्क्रिन्सवर 'कबाली' रिलीज झाला आहे. तर परदेशातही सहा हजारपेक्षा अधिक स्क्रिन्सवर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा देव म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत मराठी असले तर कर्माने तामिळ आहेत. चेन्नईत ते वास्तव्याला असतात. येथे 18, राघव वीरा एव्हेन्यू पोज गार्डन चेन्नई -86 हा चेन्नईतील रजनीकांत यांच्या घराचा पत्ता आहे. रजनीकांत यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर जमा होत असतात. रजनीकांत यांच्या घरात त्यांची विविध छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या या बंगल्याची छायाचित्रे बघायला मिळतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रजनीकांत यांच्या या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीचीसुद्धा छायाचित्रे सोशल मीडियावर बघायला मिळतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रजनीकांत यांच्या चेन्नईस्थित बंगल्याची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...