आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई येथे आहे शिल्पा शेट्टीचा Sea-Facing बंगला, पहिल्यांदाच बघा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टी बी टाऊनमध्ये लग्झरी आयुष्य जगणा-या सेलिब्रिटींपैकी एक आहे. लंडनमध्ये तिचा आणि राज कुंद्रा यांचा एक विला असून त्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. मात्र शिल्पा आणि राजचा मुंबईतील बंगलासुद्धा एखाद्या मेंशनपेक्षा कमी नाहीये. मुंबईतील जुहू येथे त्यांचा एक शानदार बंगला आहे. या बंगल्याचे नाव 'किनारा' आहे. मुंबईतील प्रसिद्ध हरे रामा हरे कृष्णा मंदिराजवळ त्यांचा हा बंगला आहे. एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते, की तिचे नेहमीपासून सी फेसिंग घराचे स्वप्न होते. ती म्हणाली होती, जिथे मी सध्या वास्तव्याला आहे, ते माझे ड्रीम हाऊस आहे.

सुझान खानने केले घराचे इंटेरिअर..
शिल्पा आणि तिच्या नव-याने घराला अतिशय सुंदर सजवले आहे. शिवाय हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानने घराचे इंटेरिअर केले आहे. घरात फेंग शुई आणि वास्तूकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. शिल्पाने घरातील प्रवेशद्वारासमोर एक गोल्डन हत्ती लावला आहे. तर सीलिंगची उंची 14 फूट ठेवण्यात आली आहे.

शिल्पाच्या या लग्झरी बंगल्याची झलक क्वचितच कुणाला पाहायला मिळली असावी. त्यांच्या किनारा या बंगल्यात अत्याधुनिक सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा दिसतो शिल्पाचा मुंबईतील आलिशान बंगला...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...