आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आकाशने सलमानच्या घरी जाऊन घेतली होती भेट, बघा \'सुल्तान\'च्या घराचे INSIDE PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आकाश ठोसरने अलीकडेच सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. - Divya Marathi
अभिनेता आकाश ठोसरने अलीकडेच सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती.
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतं. शाहरुख खान, अमिताभ बच्चन या बड्या स्टार्सच्या घराची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकदा त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाली. मात्र 'भाईजान' सलमानच्या घराची झलक क्वचितच कधी समोर आली आहे. बॉलिवूडचा 'सुल्तान' अर्थातच अभिनेता सलमान खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वांद्रा परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर सलमानचा फ्लॅट आहे.

3, गॅलेक्सी अपार्टमेंट, बीजे रोड बॅण्ड स्टॅण्ड, वांद्रा वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र- 400050 हा सलमानच्या घराचा पत्ता आहे. या अपार्टमेंटमध्ये सलमानचे आईवडील अर्थातच सलीम खान, सलमा खान, त्याची सावत्र आई हेलन, भाऊ अरबाज खान, त्याची पत्नी मलायका आणि मुले, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान वास्तव्याला आहेत. एकीकडे अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबापासून विभक्त राहत असताना सलमान मात्र एकत्र कुटुंबात राहतो. खरं तर सलमान या अपार्टमेंटमधील छोट्या फ्लॅटऐवजी एखाद्या मोठ्या बंगल्यातसुद्धा राहू शकला असता. मात्र गोतावळ्यात राहायला त्याला आवडतं. त्यामुळेच त्याने एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिले आहे.
अलीकडेच 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसरने सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. सलमानच्या घरात क्लिक झालेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर सलमानसुद्धा गॅलेक्सी अपार्टमेंटमधील याच घरी त्याचा भाचा आणि अर्पिता खान शर्मा हिच्या चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसला.
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराची काही निवडक छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहा, कसे आहे सलमानचे घर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...