आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे वास्तव्याला आहे 'भाईजान' सलमान, पहिल्यांदाच पाहा घरातील INSIDE PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतं. शाहरुख खान, अमिताभ बच्चन या बड्या स्टार्सच्या घराची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकदा त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाली. मात्र 'भाईजान' सलमानच्या घराची झलक क्वचितच कधी समोर आली आहे. सलमान खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वांद्रा परिसरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर सलमानचा फ्लॅट आहे.
3, गॅलेक्सी अपार्टमेंट, बीजे रोड बॅण्ड स्टॅण्ड, वांद्रा वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र- 400050 हा सलमानच्या घराचा पत्ता आहे. या अपार्टमेंटमध्ये सलमानचे आईवडील अर्थातच सलीम खान, सलमा खान, त्याची सावत्र आई हेलन, भाऊ अरबाज खान, त्याची पत्नी मलायका आणि मुले, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान वास्तव्याला आहेत. एकीकडे अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबापासून विभक्त राहत असताना सलमान मात्र एकत्र कुटुंबात राहतो. खरं तर सलमान या अपार्टमेंटमधील छोट्या फ्लॅटऐवजी एखाद्या मोठ्या बंगल्यातसुद्धा राहू शकला असता. मात्र गोतावळ्यात राहायला त्याला आवडतं. त्यामुळेच त्याने एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिले आहे.
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराची काही निवडक छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहा, कसे आहे भाईजान सलमानचे घर...