आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबासोबत येथे राहते एकता कपूर, पाहा तिच्या घराचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूरचे घर 'कृष्णा बंगलो' - Divya Marathi
एकता कपूरचे घर 'कृष्णा बंगलो'
मुंबई: 'टीवी क्वीन' नावाने प्रसिध्द एकता कपूरने अलीकडेच 7 जूनला बर्थडे सेलिब्रेट केला. बालाजी टेलिफिल्म्सची भागीदार एकता कपूर मुंबईमध्ये ज्या घरात राहते, त्याचे नाव 'कृष्णा बंगलो' आहे. एकताने केवळ टीव्हीच नव्हे अनेक सिनेमांतसुध्दा नशीब आजमावले आहे. एकताच्या बालाजी प्रोडक्शनने ‘डर्टी पिक्चर’, ‘वंस अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘शूट आउट एट लोखंडवाला’, ‘रागिनी एमएमएस’, ‘क्या कूल हैं हम’, ‘लव सेक्स और धोखा’, ‘लुटेरा’ आणि ‘क्या सुपर कूल हैं हम’ हे सिनेमे निर्मित केले.
कृष्णा बंगलोमध्ये राहते एकता कपूर...
एकता आपल्या कुटुंबासोबत 'कृष्णा बंगलो'मध्ये राहते. या बंगल्याचे नाव 'प्रेम मिलन'सुध्दा आहे. हा बंगला गुलमोहर एक्स रोड-5, जुहू स्कीममध्ये स्थित आहे. एकताचे इंटीरिअर खूप शानदार आहे. बंगल्यात श्रीगणेशाचे मंदिरसुध्दा आहे. गणेश चतुर्थीवेळी एकताच्या घरी अनेक कलाकार येतात. एकता आजसुद्धा भारताच्या तरुण आणि यशस्वी बिझनेसवुमनच्या रुपात ओळखली जाते.
टीव्ही मालिकांतून मिळवले नाव...
एकता कपूरने सासू-सूनेच्या टीव्ही मालिकांमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की', 'कहीं किसी रोज', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा', 'किस देश में है मेरा दिल', 'कसम से', 'कुमकुम', 'कुटुम्ब', 'बंदिनी', 'बड़े अच्छे लगते हैं', 'जोधा अकबर', मेरी आशिकी तुमसे ही, 'ये है मोहब्बतें' या मालिका तयार झाल्या आहेत. 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कुमकुम' आणि 'कहानी घर-घर की' मालिकांनी एकताला घरा-घरात ओळख मिळवून दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एकता कपूरच्या घराचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...