आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pictures Of Raveena Tandon’s Daughter Chaya\'s Marriage

Inside Pictures : रवीना टंडनची लाडकी लेक अडकली लग्नगाठीत, ख्रिश्चन पद्धतीने झाले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी छायासोबत रवीना टंडन, शेजारी छायाचा नवरा शॉन - Divya Marathi
मुलगी छायासोबत रवीना टंडन, शेजारी छायाचा नवरा शॉन
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी छायाचे अलीकडेच लग्न झाले. गोव्यात अगदी थाटात हा लग्नसोहळा पार पडला. ख्रिश्चन पद्धतीने छाया शॉन मेंडेस नावाच्या तरुणासोबत विवाहबद्ध झाली. या लग्नाच्या संपूर्ण तयारीकडे रवीनाने स्वतः लक्ष दिले होते. छाया ही रवीनाची दत्तक मुलगी आहे. रवीना 21 वर्षांची असताना तिने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले होते. 2011 मध्ये पूजाचे लग्न झाले. आता छायासुद्धा लग्नगाठीत अडकली.
रवीनाचे लग्न प्रसिद्ध चित्रपट वितरक अनिल थडानींसोबत झाले असून तिला रेशा आणि रणबीरवर्धन ही दोन मुले आहेत. या लग्नात रवीनाची ही दोन्ही मुलेही सहभागी झाली होती.
रवीनाने आईची कर्तव्ये बजावत छायाच्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये सहभाग नोंदवला. ख्रिश्चन पद्धतीने लग्न होण्यापूर्वी छाया आणि शॉनचे रजिस्टर्ड पद्धतीनेही लग्न लागले. या लग्नाची खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, छाया आणि शॉनच्या लग्नाची खास छायाचित्रे...