आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाईलाजाने फाटकी जीन्स परिधान करायचा सलमान, जाणून घ्या कसा बनला ट्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
मुंबई-  अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर \'सुल्तान\' सिनेमा बुधवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानने सुल्तानच्या रुपात आपल्या चाहत्यांना ईदी दिली आहे. चित्रपट समीक्षकांच्या मते, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करु शकतो. तीन दिवसांतच हा सिनेमा शंभर कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय करेल, असे मत जाणकार वर्तवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सलमान आपले सिनेमे ईदच्या मुहूर्तावरच रिलीज करतोय. त्याचे सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर खूप गाजले. आता सुल्तानसुद्धा नवीन रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे. कारण या सिनेमाचे अँडव्हान्स बुकिंग फूल झाले आहे. पहिल्या दिवसाचे कलेक्शनच 40 कोटींच्या घरात होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच या ईदला सलमानचाच बोलबाला बॉक्स ऑफिसवर असणार हे निश्चित झाले आहे.

हे झाले सलमानच्या लेटेस्ट प्रोफेशनल लाईफविषयी. मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयीचे असे अनेक फॅक्ट्स आहेत, ज्याविषयी कदाचित कुणाला माहिती असावी. आज सुल्तानच्या रिलीजच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सलमानच्या खासगी आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या त्याने स्वतः एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शेअर केल्या. 

नाईलाजामुळे परिधान करायचा फाटकी जीन्स-
सलमान खानला फाटलेल्या जीन्सचा ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखले जाते. त्याच्या सांगण्यानुसार, तो नाईलाजाने फाटलेली जीन्स परिधान करायचा, परंतु लोकांना त्याला ट्रेंड केले. याविषयी त्याने एक किस्सादेखील सांगितला होता. सिंधीया शाळेत शिक्षा चालू असताना त्याच्या आईचा धाकटा भाऊ, त्यांना तो टायगर अंकल म्हणायचा. त्यांनी जर्मनीवरून एक जीन्स पाठवली होती. ती जीन्स त्याने कॉलेजमध्ये असेपर्यंत परिधान केली. नंतर जीन्स खराब झाली आणि फाटली. तरीदेखील सलमान फाटलेली जीन्स परिधान करून कॉलेजला जात होता. त्यावेळी सलमानकडे केवळ दोन किंवा तीनच जीन्स होत्या. म्हणून नाईलाजास्तव त्याने ती फाटलेली जीन्स परिधान केली होती. मात्र लोकांनी ती फॅशन वाटली आणि त्यांनी ट्रेंड म्हणून वापरली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, का घड्याळच गिफ्ट म्हणून देतो सलमान आणि यासह आणखी काही रंजक बाबी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...