आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS:'शोले' चित्रपटावेळी हेमाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, रोमँटीक सीन रिटेकसाठी द्यायचे पैसै

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 1975 रोजी 42 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर रमेश सिप्पी यांचा 'शोले' प्रदर्शित झाला होता. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलिवूडच हीमॅन धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनीसुध्दा काम केले होते. सोबतच, अमजद खान यांची गब्बरची भूमिका आजसुध्दा लोकांच्या आठवणीत आहे. 
 
रमेश सिप्पी यांच्या या सिनेमात नायिकेच्या भूमिका हेमा मालिनी आणि जया भादुरी यांनी साकारल्या होत्या. या सिनेमात कलाकारांनी केलेल्या अभिनयाची आजही आठवण काढली जाते. कदाचितच त्यामुळेच तरुण पिढीलासुध्दा हा सिनेमा पसंत पडतो.
 
'शोले' चित्रपटाच्या शूटिंगवेळी धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. चित्रपटात त्यांची नायिकाही हेमा मालिनी होत्या. त्यावेळी असे म्हणतात की, रोमँटीक सीनचे शूटिंग जेव्हाही सुरु होत असे तेव्हा धर्मेंद्र लाईट बॉयला सीन बिघडवण्यासाठी पैसे देत असत. जेणेकरुन त्यांना हेमासोबत जास्तीत जास्त वेळा रिटेक देऊन शूटिंग करायची संधी मिळत असे. या चित्रपटानंतर हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1979 साली लग्न केले. 
 
70च्या दशकात देशभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'शोले' चित्रपटाचे हे Facts तुम्हाला नक्कीच माहीत नसतील..वाचा पुढच्या स्लाईडवर..
बातम्या आणखी आहेत...