आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलंडहून येते दूध, लंडनहून येते चहा पावडर! असे लॅव्हिश आयुष्य जगतो वादग्रस्त KRK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वतःला नंबर वन क्रिटिक आणि ट्रेड अॅनालिस्ट सांगणारा कमाल आर खान (केआरके) नेहमीच कोणत्या तरी विषयावरुन वादात सापडत असतो. आता ताजे प्रकरण म्हणजे अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर सक्रीय कमाल राशिद खान (केआरके) चे एक कॉल रेकॉर्डिंग गुरुवारी उघड केले. अजयची अपकमिंग मुव्ही 'शिवाय'चा प्रोड्यूसर कुमार मंगत आणि केआरके यांच्यातील बातचीत अजयने त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. यात केआरके म्हणतो, की तो करण जोहर प्रोडक्शनची फिल्म 'ऐ दिल है मुश्कील' बद्दल काहीही वाईट बोलणार नाही. ज्या व्यक्तीने 25 लाख रुपये दिले असतील त्याला फेव्हर तर करावेच लागेल. फोन रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर केआरके म्हणाला, की त्याने कोणतेही पैसे घेतलेले नाही.
अनेकदा विवादित वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या कमालची संपूर्ण लाईफ अत्यंत इंटरेस्टिंग आहे. कमालच्या सांगण्यानुसार त्यांचे दूध हॉलंडहून आणि चहा पावडर लंडनहून येते.

कमालच्या लाईफशी संबंधित काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स ....
- केआरकेचे खरे नाव राशिद खान असे आहे. त्याने त्याच्या नावापुढे 'कमाल' नंतर जोडले आहे.
- केआरकेने हीरो बनण्यासाठी घर सोडले होते. 2005 मध्ये पडद्यावर आलेल्या 'सितम' या
सिनेमापासून प्रोड्यूसर म्हणून कमालने त्याच्या करिअरला सूरुवात केली.
- यानंतर त्याने लोवबडेट असलेल्या बऱ्याच भोडपूरी आणि हिंदी चित्रपटांत काम केले.
- त्याने ट्विटरवर एका अॅक्ट्रेसला प्रपोज करून ब्रेकअपही केले आहे.
- केआरकेने टीवी अॅक्ट्रेस सारा खानला ट्विटरवर प्रपोज केले होते.
- या आधी केआरके फिल्म अभिनेत्री असिनला रोज सकाळी 'किस' पाठवण्यावरून चर्चेत आला होता.
- त्याने ट्विटरवरच ब्रेकअपही केले आहे. एका ट्विटमध्ये कमालने, 'आता मी खऱ्या अर्थाने गर्लफ्रेंड सबाहपासून वेगळा झालो आहे', मी आता टीव्ही अॅक्ट्रेस सारा खानच्या प्रेमात पडलो आहे." असे लिहिले होते.
- केआरकेने दावा केला आहे की, तो 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. त्याने सांगितल्यानुसार तो हॉलंडहून दूध मागवतो, फ्रांसहून पानी आणि लंडनहून चाहाची पावडर मागवतो.
- त्याच्या या वक्तव्याची सोशलमिडियावर जबरदस्त खल्लीही उडवण्यात आली होती.
- तो आता गारमेंट चा बिझनेस करतो. एवढेच नाही तर आखाती देशांत मजूर पाठवण्याचाही त्याचा बिझनेस आहे.
- कमालचे वर्सोवा येथे ऑफिस आहे. त्याच्या घराचा समोरचा भाग काचाचा बनलेला आहे. त्यावर मोठया अक्षरात R लिहिले आहे.
- केआरकेचा एक बंगला दुबईत असून त्याचे नाव जन्नत असे आहे.
- त्याच्या घरातील लिव्हिंग रुम, कॉरिडोर आणि जीमच्या भिंतींवर मोठमोठे फोटोज लावलेले दिसतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, केआरकेचे काही इंट्रेस्टिंग PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...