आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Actress Kareena Kapoor Khan

जाणून घ्या कसे पडले करीना नाव, वाचा बेबोच्या आयुष्यातील रंजक facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो सैफ अली खान-करीना कपूर)
मुंबई- कपूर कुटुंबीयांची लाडकी लेक आणि पटौदी घराण्याची सून करीना कपूर खान 35 वर्षांची झाली आहे. करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980ला मुंबईमध्ये झाला. ती राजकपूर यांची नात आणि रणधीर-बबीता यांची मुलगी आहे.
तिने वयाच्या 19व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. 2000मध्ये आलेल्या 'रिफ्यूजी' सिनेमातून तिने फिल्म करिअरला सुरुवात केली. या सिनेमासाठी करीनाला उत्कृष्ट पदार्पण 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाला होता. आपल्या 17 वर्षांच्या करिअरमध्ये बेबोने 'चमेली', 'देव', 'ओंकारा' आणि 'जब वी मेट'सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 'जब वी मेट'मध्ये साकारलेल्या गीतच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अनेक पुरस्कार मिळाले.
पाच वर्षे अभिनेता सैफ अली खानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर करीनाने 2012मध्ये लग्न केले. बेबोच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे करीनाच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...
बेबोला आईप्रमाणे जिव लावायची करिश्मा-
करीना आणि करिश्मा बालपणीपासूनच एकमेकांच्या खूप जवळच्या आहेत. करिश्मा नेहमी करीनाला आपल्या सिनेमांच्या सेटवर सोबत घेऊन जात होती. अशाच एका शूटवेळी सिध्द झाले, की करिश्मा करीनाला बहीण नव्हे आईप्रमाणे प्रेम करते. 1996मध्ये जेव्हा करिश्मा जर्मनीमध्ये 'हीरो नं. 1'चे शूटिंग करत होती, तेव्हा बेबोसुध्दा तिच्यासोबत होती.
सिनेमाचे दिग्दर्शक रुमी जाफरी सांगतात, 'सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आम्ही करीनाला ड्राइव्हवर घेऊन गेलो होतो. त्यावेळी बेबोचा निकाल आला आणि करिश्माला माहित झाले, की करीना चांगल्या गुणांनी पास झाली आहे. तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागले. ती करीनाला आईप्रमाणेच प्रेमम करते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...