आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चनपेक्षा जास्त फिस घेत होते प्राण, Interesting आहेत हे facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 12 जुलै जुलाई 2013 ला 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या प्राण यांनी 350 हून अधिक चित्रपटांत काम केले होते. यादरम्यान त्यांनी हिरोपासून ते व्हीलनपर्यंत अनेक भूमिका केल्या. पण त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक असे फॅक्ट्स आहेत जे बहुतांश लोकांना आजही माहिती नाहीत. आता त्यांचे नावच घ्या ना. प्राण यांचे संपूर्ण नाव प्राण कृष्ण सिकंद होते. 

वडिलांच्या नोकरीमुळे देशात विविध ठिकाणी झाले शिक्षण 
- प्राण यांचे वडील सरकारी सिव्हील कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण भारतातील विविध भागांत झाले. त्यात कपूरथला(पंजाब), उन्नाव, मेरठ, रामपूर (उत्तर प्रदेश) आणि देहरादून (उत्तराखंड) यांचा समावेश आहे. 
- त्यानंतर प्राण यांची फोटग्राफर बनायची इच्छा झाली. त्यांनी दिल्लीतील दास अँड कंपनीमध्ये काम शिकायलाही सुरुवात केली होती. 
- फोटोग्राफर म्हणून पहिली नोकरी केली तेव्हा 200 रुपये महिना पगार मिळत होता. त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून 50 रुपयांत 'यमला जट'(1940) चित्रपट केला होता. 

मुंबईत येण्यापूर्वी केले होते 22 चित्रपट 
- 1942 पासून 1947 दरम्यान प्राण लाहोरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी जवळपास 22 चित्रपटांत काम केले. पण फाळणीमुळे त्यांचे करिअर रखडले. 
- प्राण हे अत्यंत लाजाळू होते. शौकत हुसैन यांच्या 'खानदान' (1942) चित्रपटात ते हिरो होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण प्राण यांना रोमँटिक हिरो बनणे आवडले नाही. झाडांमागे चकरा मारायला आपल्याला जमत नाही, असे म्हणायचे. त्यानंतर त्यांनी कधीही हिरो म्हणून काम केले नाही. 

प्राण यांच्याबाबत असेच काही Fatcs जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...