आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Interesting Facts About Surati Girl And Actress Prachi Desai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: सूरतमध्ये जन्म, पुण्यात शिक्षण... जाणून घ्या प्राची देसाईचे Interesting Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2006मध्ये एक साधी-सरळ सून बनून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेणारी आणि आता फिल्मी दुनियेतील नावाजलेला चेहरा असलेली प्राची देसाई आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणूनही आता प्राचीला ओळखले जाऊ लागले आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी मोशन पिक्चर्सचा मोहित सूरी दिग्दर्शित 'एक व्हिलन' सिनेमात तिने एक आयटम नंबर केला होता. तिच्या या सादरीकरणाला प्रेक्षकांची पसंतीची पावतीसुद्धा मिळाली आहे. घरी फिल्मी पार्श्वभूमी नसतानादेखील तिने स्वबळावर येथे आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
पर्सनल डिटेल:
जन्म : 12 सप्टेंबर 1988
ठिकाण: सूरत, गुजरात
काम: अभिनय आणि मॉडेलिंग

एकताच्या मालिकेमधून केली करिअरला सुरूवात
12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या प्राचीने पाचगणी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमधून शिक्षम पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्याची संधी मिळाली. त्याकाळात बालाजी टेलिफिल्म्स आपल्या नवीन मालिकेसाठी नवीन चेह-याच्या शोधात होते. याच काळात पुण्यात ऑडीशन्स घेणा-या बालजी टेलिफिल्म्सकडे प्राचीने स्वतःची काही छायाचित्रे पाठवली होती. ही छायाचित्रे पाहून तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावण्यात आले आणि येथेच तिची मालिकेसाठी निवड झाली. हा प्राचीच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
'कसम से'मुळे मिळाली लोकप्रियता...
बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम से' या मालिकेमुळे प्राची घराघरांत पोहोचली. तीन बहिणींवर आधारित या मालिकेत प्राचीने बानी हे पात्र साकारले होते. या मालिकेत तिचा को-स्टार राम कपूर होता. 2006 पासून 2009पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित होणा-या या शोमध्ये प्राचीने बानी नावाचे पात्र साकारले होते. सांगितले जाते, की प्राचीला भूमिकेत झोकून देण्यासाठी एकताने तिला सर्व अभिनयाच्या टिप्स दिल्या होत्या.
'रॉक ऑन'द्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री..
एकता कपूरच्या मालिकेनंतर प्राचीने 2008 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन' या म्युझिकल सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्यानंतर प्राचीने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात प्राचीने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर प्राची 'लाइफ पार्टनर' या सिनेमात झळकली, मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.
या सिनेमांमध्ये झळकली आहे..
2008मध्ये प्राचीने मोठ्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रॉक ऑन'मधून तिने मोठ्या पडद्यावर ओळख मिळवली. फरहान अख्तरने हा सिनेमा निर्मित करून मुख्य भूमिकाही साकारली होती. त्यानंतर 'लाइफ पार्टनर' (2009) 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (2010), 'तेरी मेरी कहानी' (2012), 'बोल बच्चन' (2012), 'आय, मी और मै' (2013) आणि 'पुलिसगिरी' (2013) या सिनेमांमध्ये काम करून ती चांगलीच प्रसिध्दीस आली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा प्राचीचा लक्ष वेधून घेणारा ग्लॅमरस अंदाज...