आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2000 एकर परिसरात आहे ही फिल्मसिटी, 2.5 हजारांहून अधिक सिनेमांचे झालंय येथे शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असून तिचे नाव रामोजी फिल्मसिटी आहे. येथे आजवर अनेक सिनेमांचे शूटिंग पार पडले आहे. यापैकी अलीकडच्या काळातील  सिनेमे म्हणजे 'बाहुबली', चेन्नई एक्सप्रेस आणि विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' यांचा उल्लेख करावा लागेल. रामोजी फिल्मसिटीचे वाइस प्रेसिटेंड (पब्लिसिटी) एवी राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा समावेश झाला असून 2 हजार एकर परिसरात ही फिल्मसिटी आहे. येथे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक सिनेमांचे शूटिंग पार पडले आहे. येथेच बाहुबली 2 आणि मालिका सिया के रामचे शूटिंग झाले.  
 
500 हून अधिक सेट लोकेशन...
रामोजी फिल्मसिटीत 500 हून अधिक सेट लोकेशन आहेत. वर्षाला सुमारे 200 सिनेमांचे शूटिंग येथे केले जाते. येथे शेकडो गार्डन्स, 50 हून अधिक स्टुडिओ फ्लोअर, ऑथराइज्ड सेट्स, डिजिटल फिल्म बनवण्याची सोय, आउटडोअर लोकेशन, हाय टेक्नॉलॉजी लॅबचा समावेश आहे. येथे कॉश्च्युम डिझाइन लोकेशन, मेकअप, सेट निर्माण, कॅमेरा, सिनेमा बनवण्याचे इक्विपमेंट्स, ऑडिओ प्रॉडक्शन, डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन आणि फिल्म प्रोसेसिंगची सोय उपलब्ध आहे. रामोजी फिल्मसिटीत एकावेळी 20 परदेशी आणि 40 भारतीय सिनेमांचे शूटिंग केले जाऊ शकते. 

रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि प्लेग्राऊडंपासून सर्वकाही उपलब्ध...
रामोजी फिल्मसिटीत रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मंदिर, महल, पॉश कॉलनी, शहर, गाव, जंगल, समुद्र, नद्या, बाजार, हॉस्पिटल, कोर्ट, चर्च, गुरुद्वारा, मश्जिद, सेंट्रल जेल, खेळाचे मैदान सर्वकाही आहे. येथे सिनेमा किंवा मालिकेच्या स्क्रिप्टच्या मागणीनुसार बदलदेखील केले जाऊ शकतात. 'चेन्नेई एक्स्प्रेस' या सिनेमाचे रेल्वे सीनचे शूटिंग येथे असलेल्या रेल्वे स्टेशनवरच झाले होते. 

'बाहुबली'पासून ते 'रोबोट'पर्यंतचे स्पेशल इफेक्ट झाले शूट...
बाहुबली या सिनेमातील मोठा झरा फिल्मसिटीतच बनवण्यात आला होता. याशिवाय रजनीकांत स्टारर रोबोट या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट रामोजीतच तयार करण्यात आले होते. हृतिक रोशनच्या क्रिशपासून ते शाहरुखच्या दिलवालेचे शूटिंग याच ठिकाणी झाले आहे. सरकार राज या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात बिग बी बराच काळ येथे वास्तव्याला होते.

रामोजी मुव्ही मॅजिकची एक वेगळीच मजा...
रामोजी फिल्म  सिटीचे मॅनेजर सुमित वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्मसिटीत  मुव्ही मॅजिक नावाचा एक मोठा हॉल आहे. येथे लोकांना वेगवेगळ्या छोट्या हॉलमध्ये सिनेमा निर्मितीविषयी माहिती  दिली जाते. यामध्ये कॅमेरा, साऊंड, एडिटिंग, मिक्सिंगसोबतच अनेक गोष्टींचा लाइव्ह डेमो दिला जातो. खास गोष्ट म्हणजे हा लाइव्ह डेमो देण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांमधूनच लोकांची निवड केली जाते. उदाहरणार्थ हीरो, हीरोईन, व्हिलनची निवड करुन सिनेमा कसा बनवला जातो, ते येथे दाखवले जाते. येथे एशियातील सर्वात मोठे अॅडव्हेंचर पार्क आणि बर्ड पार्कसुद्धा आहे. 

पुढील स्लाईडमध्ये वाचा, दररोज पाच हजारांहून अधिक लोक येतात फिल्मसिटी बघायला...
बातम्या आणखी आहेत...