आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS : सनीने वयाच्या 11 व्या वर्षी पहिला किस तर 16 व्या वर्षी केला होता सेक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः सनी लिओन)
सनी लियोन हे आज बी टाऊनमधील प्रसिद्ध नाव आहे. मात्र बॉलिवूड सिनेमांमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सनीची लोकप्रियता देशभरात होती. यामागे असलेले कारण म्हणजे पोर्न स्टारचा टॅग. बी टाऊनमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी सर्वजण सनीला पोर्न स्टार म्हणून ओळखत होते. 13 मे रोजी जन्मलेली इंडो-कॅनेडियन अभिनेत्री सनी आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.
सनीला पोर्न स्टार इमेजमुळे जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. अलीकडेच रिलीज झालेला 'रागिनी एमएमएस 2' हा सिनेमासुद्धा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
सनीला आता स्वतःची पोर्न स्टारची इमेज पुसून काढायची आहे. त्यामुळेच तिने मीडियाकडे अपील केली होती, की तिला आता तिच्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारले जाऊ नयेत. ती आता यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री बनू इच्छिते.
आज सनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याविषयी खास गोष्टी सांगत आहोत.
- भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला.
- सनीने वयाच्या 19व्या वर्षी अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. सनीच्या आईवडिलांना तिच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता, मात्र नंतर त्यांनी तिचे हे करिअर स्वीकारले.
- कॅथलिक शाळेत शिकलेल्या सनीने वयाच्या 11 व्या वर्षी पहिला किस केला होता, तर वयाच्या केवळ 16 व्या वर्षी एका बास्केटबॉल खेळाडूसोबत शारीरिक संबंध ठेवले होते.
- अॅडल्ट स्टार बनण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत काम करायची. याशिवाय तिने काही काळ टॅक्स अँड रिटार्यमेंट फर्ममध्येही काम केले.
- पोर्न इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी सनी पीडियाट्रिक नर्सिंगचे (बाल चिकित्सा) शिक्षण घेत होते.
- भारतात 2011मध्ये सनी पहिल्यांदा बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात टीव्हीवर झळकली होती. त्यानंतर तिने सिनेमांत काम करायला सुरुवात केली.
- बालपणापासूनच सनीची यशस्वी अभिनेत्री होण्याची इच्छा होती.
- सनीला वेगवेगळ्या प्रकारचे पराठे विशेष आवडतात. याशिवाय इटॅलियन फूडसुद्धा तिला पसंत आहे.
- सनीला प्राण्यांचीही विशेष आवड आहे. तिच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत.
- सनी लियोन एका प्रॉडक्शन हाऊसचीदेखील मालकीण आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सनलस्ट पिक्चर्स असे आहे.
- सनीने आत्तापर्यंत 42 पोर्न सिनेमे दिग्दर्शित केले आहेत, तर 41 सिनेमांमध्ये पोर्न स्टार म्हणून कामदेखील केले आहे.
- डेनियल वेबरसोबत लग्न करण्यापूर्वी सनी प्लेबॉय एन्टरप्राइजेसचे उपाध्यक्ष मॅट एरिक्सनला डेट करत होती. मात्र 2008मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.
- मागील एका मुलाखतीत सनीने लवकरच आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- सिनेमात येण्यापूर्वी सनी आपल्या कुटुंबीयांसह चार वेळा भारतात आली होती.
- कामाच्या निमित्ताने जग फिरणा-या सनीचा फिरणे हा आवडता छंद आहे.
- एका मुलाखतीत सनीने म्हटले होते, ''मला माझ्या मागील करिअरबद्दल कोणतीही निराशा किंवा पश्चाताप होत नाहीये. पोर्न करिअरमुळेच मला बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणे शक्य झाले. जर मी पोर्न इंडस्ट्रीत नसते तर मला एवढी प्रसिद्धी मिळू शकली नसती.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिनधास्त सनीच्या विविध फोटोशूट्समधील बोल्ड अदा...