आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fact & Rare Pics : एकेकाळी रेस्तराँमध्ये वेटरचे काम करायची सोनम, रणवीर सिंहची आहे बहीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: करिअरच्या केवळ आठ वर्षांत सुमारे 20 सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री सोनम कपूर तरुणाईची स्टाइल आयकॉन आहे. अनिल कपूर यांची ही लाडकी लेक आज 31 वर्षांची झाली आहे. 2007 मध्ये 'साँवरिया'पासून ते 2015 मध्ये 'नीरजा भनोत'पर्यंतचा सोनमचा प्रवास बराच रंजक आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आणि बॉलिवूडच्या आघाडीच्या स्टार्ससोबत सोनमने काम केले आहे.
सोनमच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत, याविषयी कदाचितच तिच्या चाहत्यांना ठाऊक असावे....
रेस्तराँमध्ये वेटर होती सोनम...
सोनमची पहिली नोकरी ही वेटरची होती. आश्चर्यचकित झालात ना. अनिल कपूरची लेक असूनदेखील आपल्या पॉकेटमनीसाठी सोनमने एका रेस्तराँमध्ये वेटरचे काम केले होते. सिंगापूरमध्ये असताना तिने तेथील एका रेस्तराँमध्ये वेटरचे काम केले होते. शिवाय तिने बसनेही प्रवास केला आहे.
वाढलेल्या वजनावर टीका केल्याने बॉयफ्रेंडसोबत केले होते ब्रेकअप...
आपल्या वाढलेल्या वजनामुळे तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केले होते. एकदा तिच्या बॉयफ्रेंडने वाढलेल्या वजनामुळे तिच्यावर टीका केली होती. त्यामुळे सोनमने त्याच्यासोबतचे आपले नाते संपुष्टात आणले.

सोनमला आहे मधुमेह...
वयाच्या 19 व्या वर्षी सोनमचे वजन 86 किलो होते. लठ्ठपणामुळे सोनमला मधुमेह झाला.

सोनमची आई आणि रणवीरचे वडील आहेत बहीणभाऊ..
अभिनेता रणवीर सिंह सोनमचा मामेभाऊ आहे. सोनमची आई आणि रणवीरचे वडील चुलत बहीणभाऊ आहेत.

'साँवरिया'साठी होकार द्यायला लावली दीड वर्षे...
'साँवरिया' या सिनेमासाठी सोनमचा होकार मिळवायला संजय लीला भन्साळींना दीड वर्षे लागली होती. सोनमने अभिनयाविषयी कधी विचारच केला नव्हता. त्यामुळे तिची समजूत घालायला भन्साळींना एवढा काळ लागला.

बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय...
बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय सोनमने घेतला आहे. दुस-या क्षेत्रातील व्यक्तीची ती जोडीदाराच्या रुपात निवड करणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनमची अतिशय जुनी छायाचित्रे, जी क्वचितच तुमच्या बघण्यात आली असावीत...
बातम्या आणखी आहेत...