मुंबईः अभिनेता शाहरुख खान स्टारर 'फॅन' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सिनेमात शाहरुखने सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा मोठा फॅन असलेला गौरव अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सिनेमात शाहरुखने 22 वर्षीय गौरवची भूमिका साकारण्यासाठी हॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ग्रॅग कॅनॉम यांची मदत घेतली. ग्रॅग हे हॉलिवूडचे स्पेशल मेकअप इफेक्ट्ससाठी ओळखले जातात. गौरवसारखा लूक मिळवण्यासाठी शाहरुखला सुरुवातीला सहा तास मेकअपसाठी द्यावे लागायचे. कालांतराने दोन ते तीन तासांत मेकअप होऊ लागला.
'फॅन'शी संबंधित आणखी काही रंजक फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...