Home »Gossip» Interesting Stories About Amitabh Bachchan

चोरी केल्यामुळे जेव्हा बिग बींना बसली होती थापड, तुम्ही वाचले आहेत का अमिताभ यांचे हे किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:38 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन 75 वर्षांचे झाले आहेत. 11 ऑक्टोबर 1942 ला अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या अमिताभ यांच्या जीवनातील असे अनेक किस्से आहेत जे बहुतांश लोकांनी ऐकलेले नसतील. या पॅकेजमध्ये असेच काही किस्से वाचकांसाठी आणले आहेत. चला तर मग जाणून घेऊ काय आहेत हे किस्से...

चोरी केल्यामुळे खाल्ली होती थापड...
- अमिताभ कुटुंबासह अलाहाबादच्या क्लाइब रोडवरील दशद्वारमध्ये राहत असतानाची ही घटना आहे. याच रोडच्या जवळ राणी बेतियाची एक कोठी होती. तिचे दार नेहमी बंद असायचे. एक जण कायम त्याठिकाणी पहारा देत असायचा.
- अमिताभ यांना या कोठीमध्ये जायचे होते. कारण त्याबाबत आणि राणीबाबत बिग बींनी अनेक किस्से ऐकलेले होते.
- एक दिवस ते शशी आणि नरेश या मित्रांबरोबर पहारेदाराजवळ गेले आणि आत जाण्यासाठी विचारले. त्यावेळी त्याने चारआणे दिले तर आत जाऊ देईल असेल सांगितले.
- फारवेळ विचार केल्यानंतर अमिताभ घरी गेले आणि त्यांनी ड्रेसिंग टेबलमधील त्यांची आई तेजी चिल्लर पैसे टाकायच्या तो कप्पा उघडला. त्यातून चारआणे चोरून त्यांनी पहारेदाराला दिले. त्या पहारेदाराने चारआणे तर घेतले तर त्यांना आत जाऊ देण्याऐवजी रागावून परत पाठवले.
- अमिताभ घरी आले तेव्हा तेजी यांनी त्यांना गालावर एक जोरदार थापड लगावली. कारण अमिताभ यांनी चार आणे चोरल्याचे त्यांना समजले होते. नंतर वडिलांनी अमिताभ यांना विचारले तेव्हा त्यांनी सर्वकाही सांगितले. त्यावर त्यांच्या वडिलांनी चोरी करणे वाईट असते असे सांगितले. त्यानंतर अमिताभ यांनी याची खुणगाठ बांधली.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या असेच काही आणखी किस्से...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended