एन्टरटेन्मेंट डेस्कः कॅनेडिअन पॉर्नस्टार आणि भारतीय अभिनेत्री सनी लियोन आणि डॅनियल वेबर यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. 20 जानेवारी 2009 रोजी पंजाबी पद्धतीने सनी, डॅनियलसोबत विवाहबद्ध झाली होती. सध्या सनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतकार भुपेंद्र चौबे यांनी तिला असे प्रश्न विचारले की, अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला. इतकेच नाही तर भुपेंद्र चौबे यांनी सनीचा उल्लेख ‘पॉर्न क्वीन’ असाही केला. यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून भुपेंद्र चौबेवर टीका केली तर तोल न ढासळता उत्तर देणाऱ्या सनीचे कौतुक केले.
सनीचा नवरा डॅनियलने
आपल्या पत्नीला 'ट्रू चॅम्पिअन' म्हणून संबोधले आहे. सनी आणि डॅनियलकडे इंडस्ट्रीतील एक स्टायलिश कपल म्हणून बघितले जाते. डॅनियल नेहमीच सनीच्या पाठिशी खंबीरपणे उभा दिसतो. ती देखील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या नवऱ्याला देते.
आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सनी आणि डॅनियलच्या लव्हस्टोरीसोबतच डॅनियल कोण आहे, याविषयीची माहिती देतोय....