आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Avani Modi Shared Some Experience With Divyamarathi.com

या अभिनेत्रीला व्हायचे होते पॉलिटीशिअन, अभिनयाच्या छंदाने बदलले आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अॅक्ट्रेस अवनी मोदी)
चंदीगड- अभिनेत्री अवनी मोदी गुजरातहून आहे. ती तिथेच लहानाची मोठी झाली आहे. आता मधूर भंडारकरच्या सिनेमातून तिने पदार्पण केले आहे. चंदीगडमध्ये झालेल्या भेटीत अवनीने अभिनय क्षेत्रात येण्याची कहाणी दिव्य मराठीसोबत शेअर केली. ती सांगते, 'मी वयाच्या आठव्या वर्षीच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचे ठरवले होते. शाळेत हुशार होते, मात्र ध्येय ठरवू शकत नव्हते. म्हणून कधी डान्सर तर कधी एमबीए किंवा सीए करण्याचा विचार करत होते. मात्र नशीबाला काही वेगळेच मान्य होते, आता मी एक अभिनेत्री झाली आहे. जर मी अभिनेत्री झाले नसते तर राजकारणात गेले असते. या क्षेत्रात वेगळ्या कला दडलेल्या आहेत. त्या आपल्याला अनेक आयुष्य जगण्याची संधी देतात. मला अभिनयाचा शौक आहे.'
'हे एक असे क्षेत्र आहे, ज्यात लोक मेल्यानंतरसुध्दा स्मृतीत राहतात. हीच गोष्ट मला भावली आणि प्रामाणिकपणाचे पात्र साकारण्यासाठी प्रेरित करते.' मधूर भंडारकरसोबत काम केल्याच्या अनुभवावर अवनी सांगते, 'मला मधूरने सांगितले होते, की अवनी तुझी कल्पकता सोडू नकोस. इंडस्ट्रीमध्ये तुला अशा ऑफर्स मिळतील ज्या रात्रीतून स्टार बनवतील. परंतु तू स्वत:ला विसरू नकोस. याच अदांसोबत राहा, ज्या आता आहेत. कारण जे तुझ्यासाठी आहे, ते तुला कोणत्याही परिस्थित मिळेल.'
अनेक उतार-चढाव पाहिले-
आईड-वडील म्हणायचे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच अभिनेत्री व्हायचे स्वप्न बघ. अभिनयात हिच पदवी तुझ्या कामात येईल. म्हणून शिक्षण संपवून 2012मध्ये मुंबईला आले. दोन तामिळ सिनेमे आणि काही कमर्शिअल केले आहेत. आयुष्यात अनेक उतार-चढाव पाहिल्यानंतर मधूरसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली.
मी अशी आहे-
अवनी म्हणजे पृथ्वी. आपल्या नावाप्रमाणेच मातीशी जुळलेली आहे. खूप महत्वकांक्षी आहे आणि आपल्या आदर्शनां कोणत्याही परिस्थित सोडू शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवनीचे काही ग्लॅमरस फोटो...