आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intolerance To AIB Roast: Aamir Khan Controversies That Shocked All

बिग बी, शाहरुखवरही केली होती वादग्रस्त टिका, या आहेत आमिरच्या टॉप Controversies

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता आमिर खान नेहमी सोशल मुद्दयांवर वक्तव्य देत असतो. परंतु यावेळी त्याने आपल्या एका वक्तव्याने वादाला तोंड फोडले आहे. इतर अभिनेत्यांप्रमाणेच आमिरनेसुध्दा कथितरित्या असहिष्णुतेच्या मुद्दयावर स्वत:चे मत मांडले आहे.
आमिरने सांगितले, की त्याला आपल्या मुलांच्या असुरक्षततेविषयी भिती वाटत आहे. सोमवारी रात्री (23 नोव्हेंबर) एका मीडिया ग्रुप अवॉर्ड फंक्शनमध्ये आमिरने सांगितले, 'देशातील वातावरण पाहून एकदा माझी पत्नी किरणने मोठे आणि भितीदायक वक्तव्य केले होते. किरण म्हणाली होती, की आपण हा देश सोडावा का? किरणला मुलांच्या सुरक्षतेविषयी भिती वाटत होती.'
वादाच्या भोव-यात अडकला आमिर-
आमिरच्या या वक्तव्यानंतर त्याला प्रश्नांनी घेरले आहे. लोकांनी त्याच्यावर टिकास्त्राला सुरुवात केली आहे. अनुपम खेर आणि परेश रावल सारख्या बॉलिवूड कलाकारांनीसुध्दा त्याच्या विरोध केला आहे. आमिरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. आमिर सर्वत्र प्रश्न विचारले जात आहेत.
अनुपम खेर यांनी लिहिले, 'प्रिय आमिर खान, कधी तू किरण विचारले आहे का तिला कोणत्या देशात जायचे आहे? तू कधी तू किरणला सांगितले का, या देशाने तुला आमिर खान बनवले आहे?'
दुसरे टि्वट, 'प्रिय आमिर खान, तू कधी किरण सांगितले आहे का, तू देशात यापेक्षाही वाईट परिस्थिती पाहिली आहे. परंतु कधी तूझ्या मनात देश सोडण्याचा विचार आला नाही.'
परेश रावल, 'भारतात राहणारे व्यक्ती आपली मातृभूमी कधीच सोडू शकत नाहीत. मी आमिरच्या वक्तव्याने हैराण झालोय.'
यापूर्वीही अडकला आहे वादात-
असहिष्णुतेच्या मुद्दयावर आमिर सध्या प्रश्नाने घेरला आहे. परंतु असे पहिल्यांदाच होत नाहीये, की तो एखाद्या वादात अडकत आहे. कारण यापूर्वीसुध्दा आमिर अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादात अडकत आला आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे आमिरच्या टॉप कॉन्ट्रानव्हर्सीजविषयी...