आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीर-दीपिकाचा झाला गुपचुप साखरपुडा? काही दिवसांपूर्वीच चर्चेत होते ब्रेकअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी गुपचुप साखरपुडा केल्याची बातमी आहे. असे आम्ही नाही, तर एका लिडींग न्यूज पोर्टलमध्ये प्रकाशित झालेले वृत्त सांगत आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी सिंह आणि पदुकोण कुटुंबीयांची भेट झाली होती. याचवेळी दोघांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मेड्रिडमध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्स सोहळ्यातसुद्धा रणवीर स्टेजवर परफॉर्म करत असताना दीपिका त्याला फ्लाइंग किस देताना दिसली होती. यापूर्वी मात्र दोघांचे ब्रेकअप झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. काय होती ती बातमी...

यावर्षी जून महिन्यात रणवीर आणि दीपिका यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. याविषयी दीपिकाला मुलाखतीत विचारले असता, ती म्हणाली होती, "याविषयी मला आता काहीही बोलायचे नाही. मात्र रणवीर माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो कायम असेल. हे सत्य बदलता येणार नाही." आता दोघांच्या साखरपुड्याची बातमी खरी आहे की खोटी हे तर येणारा काळच सांगेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, रणवीर आणि दीपिकाचे रोमँटिक क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...