आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशील कुमार शिंदेंच्या नातवासोबत सैफच्या 23 वर्षांच्या मुलीचा झाला साखरपुडा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. अलीकडेच सारा 'सैराट' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. त्यावेळी ती सतत आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिच्या रिंग फिंगरमध्ये एक अंगठी दिसली. तेव्हापासून खरंच साराचा तिचा बॉयफ्रेंड वीर पहरियासोबत साखरपुडा तर झाला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या दोघांच्या अफेअरची बातमी याचवर्षी मे महिन्यात लीक झाली होती. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सारा आता 23 वर्षांची आहे.

जेव्हा साराला KISS करताना दिसली वीर...
- प्रसिद्ध राजकाराणी आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वीर पहरिया हा नातू आहे.
- वीर दुबईत शिकत असून पॉप स्टार बनण्याची त्याची इच्छा आहे.
- मे महिन्यात मीडियात एक फोटो व्हायरल झाला होता, यामध्ये वीर साराला किस करताना दिसतोय.
- एका FM वाहिनीशी बोलताना सारा वीरविषयी म्हणाली, "तो स्त्याच्या कडेला मिळणारा डोसा सहज खाऊ शकतो. तो खूप सेंसिटिव्ह असून अशी एक व्यक्ती आहे, जिच्यासोबत तुम्ही बीचवर जाणे पसंत कराल."
बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे सारा...
- 23 वर्षीय साराने कोलंबिया युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून तिला आता बॉलिवूडचे वेध लागले आहेत.
- रिपोर्ट्सनुसार, करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमाद्वारे सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाद्वारे शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसुद्धा डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'सैराट'च्या स्क्रिनिंगवेळी आणि वीर पहरियासोबतची सारा अली खानची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...