आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONFIRMED: सलमान खानच्या घरी आली गोड बातमी, बहीण अर्पिता आहे प्रेग्नेंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सलमान खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा - Divya Marathi
फाइल फोटोः सलमान खान, अर्पिता खान आणि आयुष शर्मा

मुंबईः बॉलिवूडचा 'दबंग' अर्थातच अभिनेता सलमान खानच्या घरी गणेशोत्सवानंतर एक आनंदाची बातमी आली आहे. बातम्यांनुसार, सलमानची धाकटी बहीण अर्पिता प्रेग्नेंट असून सलमान लवकरच मामा बनणारेय. याची माहिती सलमानचा धाकटा भाऊ अरबाज खानने दिली.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने सांगितले, ''होय हे खरे आहे. अर्पिता लवकरच आई होणारेय. आम्ही या गोड बातमीमुळे खूप आनंदीत आहोत. अर्पिताची डिलिव्हरी पुढील वर्षी होईल.'' सलमान तिस-यांदा मामा होणारेय. त्याची मोठी बहीण अलविरा हिला दोन मुले असून एलीजा आणि अयान ही त्यांची नावे आहेत.
सलमानची मानलेली बहीण अर्पिता गेल्यावर्षी 18 नोव्हेंबरला बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकली. हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये आयोजित शाही लग्नसोहळ्यात हे दोघे विवाहबद्ध झाले. अलीकडेच सलमानच्या घरी झालेल्या गणपती सेलिब्रेशनमध्ये अर्पिता आपल्या पतीसोबत सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्पिता-आयुषच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...