आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Leak झाले श्रीदेवीच्या मुलीचे किसींग PHOTOS, सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाबरोबर जुळले सूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशील कुमार शिंदेंंचा नातू शिखर पहरियासोबत जान्हवी कपूर - Divya Marathi
सुशील कुमार शिंदेंंचा नातू शिखर पहरियासोबत जान्हवी कपूर

मुंबईः श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूरचे काही खासगी फोटोज इंटरनेटवर लीक झाले आहेत. या फोटोजमध्ये जान्हवी एका तरुणाला किस करताना दिसत आहे. एका लीडिंग एन्टरटेन्मेंट पोर्टलने दावा केला आहे, की हा तरुण जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहरिया आहे. रिपोर्ट्सनुसार शिखर प्रसिद्ध राजकीय नेते आणि एक्स युनियन मिनिस्टर सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. काही महिन्यांपूर्वी शिखरचा भाऊ वीर पहरिया आणिल सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियात प्रसिद्ध झाल्या होत्या.

१९ वर्षांची आहे जान्हवी...
जान्हवीने याचवर्षी ६ मार्च रोजी आपला १९ वा वाढदिवस साजरा केला. रिपोर्ट्सनुसार, ती सध्या लॉस एंजिलिस येथे द ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्युटमधून अभिनयाचे धडे गिरवत आहेत. १९ व्या वाढदिवशीसुद्धा ती आपल्या कुटुंबापासून दूर परदेशात होती. यावेळी श्रीदेवीने जान्हवीचा बालपणीचा एख फोटो शेअर करुन सोशल मीडियावर लिहिले होते, “Missing you Janu. Happy Birthday!”
अलीकडेच नाकारला बिग बॅनरचा सिनेमा...
अनेक प्रसिद्ध निर्माते जान्हवीला आपल्या सिनेमातून लाँच करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र श्रीदेवी आणि बोनी कपूर अद्याप आपल्या मुलीला सिनेसृष्टीत लाँच करण्याच्या विचारात दिसत नाहीयेत. गजनी आणि हॉलिडे या सिनेमांचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आपल्या एका तेलगू सिनेमात जान्हवीला साईन करु इच्छित होते. यानिमित्ताने त्यांनी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची भेटदेखील घेतली, मात्र दोघांनीही यासाठी नकार दिला आहे. जान्हवी अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी रेडी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुरुगदास यांच्या या सिनेमाचे बजेट दीडशे कोटी असल्याचे म्हटले जाते. महेश बाबू या सिनेमात हीरो आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, जान्हवीचे काही Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...