आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी मुखर्जीची लेक आदिराचा समोर आला पहिला फोटो!, सोशल मीडियावर झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री राणी मुखर्जी आणि प्रसिद्ध निर्माता आदित्य चोप्रा यांची लेक आदिराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राणीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट @iamranimukerji वर आदिराचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणी मुखर्जी आपले खासगी आयुष्याविषयी फारसे कधी बोलताना दिसत नाही. मात्र यावेळी तिच्या सोशल मीडियावर आदिराचे फोटो शेअर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला राणीने आदिराला जन्म दिला. त्यानंतर राणी बॉलिवूडच्या लाईमलाईटपासून दूर होती. आदिरा आता 7 महिन्यांची झालीये. तेव्हापासून आत्तापर्यंत आदिराचा एकही फोटो समोर आला नव्हता. मात्र हा फोटो आदिराचाच आहे की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

विशेष म्हणजे dainikbhaskar.com ने यशराज फिल्म्स (YRF)सोबत संपर्क साधला असता, त्यांनी हा फोटो फेक असल्याचे सांगितले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, राणी मुखर्जीच्या @iamranimukerji या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर झालेली आदिराची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...